पेड न्यूजच्या संदर्भात निवडणूक आय़ोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा स्तरावर मिडिया सर्टिफिकेशन ऍन्ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून पेड न्यूजवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
रायगडातील माध्यमांचे संपादक आणि इलेक्टॉनिक मिडियाचे प्रतिनिधी यांची विशष बैठक गुरूवारी अलिबाग येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुमंत भांगे यानी निवडणूक मुक्त,निर्भय आणि शांततेच्या मार्गाने पार पडावी यासाठी माध्यमांनी सक्रीय योददान द्यावे असे आवाहन केले.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत मतदार नोंदणी करता येणार आहे यासंबंधीची जनजागृती माध्यमांनी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक कालावधीत माध्यमांनी पेड न्यूज घेऊ नयेत असे आवाहन करतानाच पेड न्यूज रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींची मतं जाणून घेतली.