रहा रे बॉडीगार्डविना…

    0
    962

    रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यासह जिल्हयातील आठ आजी-माजी लोकप्रतिनिधींना सरकारी खर्चाने देण्यात येणारे स्टेनगन किंवा कार्बाईन बंदुकधारी पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहे.पालकमंत्री सुनील तटकरे यांची नेहमीची एस्कॉट- पायलट व्यवस्था काढून घेऊन केवळ एक व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी त्यांना देण्यात आला आहे.मात्र उव्ररित आठ लोकप्रतिनिधींना अशी सुरक्षा व्यवस्था असणार नाही. त्यामध्ये माजी आमदरा मधुकर ठाकू र,माणिकराव जगताप,आमदार सुरेश लाड,अनिल तटकरे,आमदार भरत गोगावले,माजी आमदार देवेंद्र साटम,माजी मंत्री रवीशेठ पाटील,आणि पंडित पाटील यांचा समावेश आहे.
    पोलिस संरक्षण निवडणूक काळातही कायम ठेवल्यास त्याचा मतदानावर विपरित परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे संरक्षण काढून घेण्यात येत असल्याचे निवडणूक यंत्रणेतर्फे सांगण्यात आले.
    जिल्हयात एकूण 1 हजार 882 खासगी व्यक्तींक डे शस्त्र परवाने आहेत.त्यापैकी 1 हजार 694 जणांकडून रिवॉल्वर वा बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली.

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here