आरसीएफचे दोन प्लांट बंद

0
865

रायगड जिल्हयातील पाणी टंचाईचा फटका आता जिल्हयातील विविध प्रकल्पांना बसायला लागला असून अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठ्या थळ येेथील आरसीएफ प्रकल्पाचे दोन प्लांट पाण्याअभावी बंद करण्याची वेळ आरसीएफ प्रशासनावर आली आहे.आरसीएफला रोहा तालुक्यातील कोलाडनजिकच्या अंबा केटी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो या प्रकल्पातील पाणी साठ्यात लक्षणिय घट झाल्यानं आरसीएफवर दोन प्लांट बंद कऱण्याची वेळ आली आहे.येत्या आठ-दहा दिवसात प्रकल्पातील पाणी साठी वाढला नाही तर संपूर्ण प्लांट बंद कऱण्याची वेळ आरसीएफवर येणार आहे.

आरसीएफ प्रकल्पातून दरवर्षी 18 लाख मॅट्रिक टन युरिया,12 लाख मॅट्रिक टन अमोनिया आणि हजारो मॅट्रिक टन रसायन निर्मिती केली जाते.मात्र कंपनीतील दोन महत्वाचे प्लांट बंद पडल्याने त्यााच उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.आरसीएफच्या माध्यमातून परिसरातील अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो.मात्र आरसीएफचाच पाणी पुरवठा घटल्याने या गावांसमोरही आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रायगडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असला तरी जलसाठ्यात कोठेही वाढ झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here