मराठी पत्रकार परिषदेचे सर्व जिल्हाअध्यक्ष,तालुका अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी
मित्रांनो,
स्थानिक पातळीवरील छोटी आणि मध्यम वर्तमानपत्रे टिकली पाहिजेत,वाढली पाहिजेत ही परिषदेची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे.त्यामुळं या पत्रांच्या अस्तित्वाच्या विरोधात जेव्हा जेव्हा कारस्थान रचले गेले तेव्हा तेव्हा परिषद सर्व शक्तीनिशी या पत्रांच्या बाजुनं उभी राहिलेली आहे.आजही ही पत्रे अडचणीत आहेत.सरकारी यादीवरून 324 नियतकालिकं बचावाची कोणतीही संधी न देता उडविली गेली आहेत.आणखी 400 ‘बळीचे बकरे’ नक्की केले जात आहेत.त्याविरोधात मोठा असंतोष आहे.अशी स्थितीत परिषद आक्रमकमपणे या पत्रांच्या बाजुनं उभी राहिली पाहिजे.हा विषय घेऊन आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना तर भेटत आहोतच पण त्या अगोदर 26 जानेवारीला परिषदेशी संलग्न सर्व जिल्हा संघांनी छोट्या पत्रांच्या मालकांना बरोबर घेऊन पालकमंत्र्यांची भेट घ्यावी आणि आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडावी.सरकारी आदेशाला किमान सहा महिने स्थगिती दिली जावी अशी आपली मागणी आहे.सर्व जिल्हा संघांनी यासाठी प्रयत्न करावेत.

LEAVE A REPLY