तळोजा पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्हयात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी अलिबागच्या न्यायालयात धाव घेतली आहे.त्यांच्या जामिन अर्जावर उद्या 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
पनवेल तालुक्यातील रोहिजण येथील 25 एकर जागेत 2 हजार 344 निवासी गाळे बांधण्याचा महतकांक्षी प्रकल्प देवीशा एन्फ्रस्ट्रक्चर कंपनीतर्फे सुरू करण्यात आला होता .मात्र हा प्रकल्प पूर्ण केला गेला नाही.त्यामुळे मंहमद युनुस शेख यांनी पंकज भुजबळ आणि कंपनीच्या अन्य संचालकांच्या विरोधात 44 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला होता.13 जून 2015 रोजी दाखल झालेल्या या गुन्हयाचा आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून न्यायालयाला आपला अहवाल दाखल केला होता.या प्रकरणात आपणास अटक होऊ शकते हे पंकज भुजबळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अलिबागच्या न्यायालयात धाव घेतली आहे.-