पत्रकारांवरील हल्ल्याच्या दोन घटना

0
1048

पत्रattack-1कारांवरील हल्लयाच्या दोन घटना आज समोर आल्यात.पहिली घटना सिंधुदुर्गमध्ये घडली.मालवण येथील पुढारीचे प्रतिनिधी परेश राऊत यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला.त्यांच्यावर सुरीचे वारही कऱण्याचा प्रयत्न झाला.चेतन ज्ञानेश्‍वर मुळेकर हा व्यक्तीने हा हल्ला केल्याचे राऊत यांनी मालवण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.मालवण तालुका पत्रकार संघाने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
दुसरी घटना नवी मुंबईत घडली.नेरूळ येथील दीपिका बार वर पोलिसांनी कारवाई केली आहे.त्याची बातमी घेण्यासाठी नवी मुंबई आवाजच्या प्रतिनिधीवर हल्ला केला गेला.त्यांचे अपहरणही करण्याचा प्रयत्न झाला.या प्रकरणाची तक्रार नेरूळ पोलिसात दाखल दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलिस अधिक तपास करीत आहेत-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here