नोटा बंदीचा देशाला फायदाच – मोदी

0
673
रायगडः देशाच्या हितासाठी यापुढेही कठोर निर्णय घ्यायला आपले सरकार मागे-पुढे पाहणार नाही असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नोटाबंदी निर्णयाचे जोरदार समर्थन केले.
रायगड जिल्हयातील रसायनी येथील सेबीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ से्क्युरिटी मॅनेजमेंटचे उदघाटन थोड्या वेळापुर्वी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.
कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अरून जेटली,महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस आदि मान्यवर उपस्थित होते.एनआयएसएममध्ये पाच हजार विद्यार्थ्याच्या शिक्षमाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान पुढे म्हणाले,नोटा बंदीचा थोडा त्रास सध्या देशातील जनतेला होत असला तरी नोटाबंदीचे दुरगामी फायदे होणार आहेत.
देशात परकीय गुंतवणुकीत वाढ झालेली असल्याचे सांगून पंतप्रधानांनी जीएसटीचा कायदा लवकरच लागू करण्यात येईल असे जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यक्रम स्थळी जात असताना एचओसी कंपनीच्या कामगारांनी तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी लाल झेंडे दाखवून पंतप्रधानांचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here