देशात भलेही नोटांची टंचाई असेल पण इकडं व्हीआयपींची अजिबात टंचाई नाही.उलट व्हीआयपींचं अमाप पीक आलंय.आपल्या देशात 5,79,096 व्हीआयपी आहेत असं आज टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.अन्य देशातली आकडेवारी देखील टाइम्सनं दिलीय.ब्रिटनमध्ये अधिकृत 84 व्हीआयपी आहेत,फान्समध्ये 109,जपान 125,जर्मनी 142,ऑस्ट्रेलिया 205,अमेरिका 252 ,दक्षिण कोरिया 282,रशिया 312,आणि चीनमध्ये 435 पदांना व्हीआयपींचा दर्जा दिलेला आहे.भारतातली संख्या काही लाखांत आहे.यामध्ये राष्ट्रपतींपासून,विविध राज्यांचे राज्यपाल,आणि थेट नगरसेवकांपर्यंतचा समावेश आहे.व्हीआयपी कल्चर संपवा म्हणून आपण कितीही बोंबा मारत असलो तरी व्हीआयपींची संख्या सर्व जगातले व्हीआयपी एका बाजुला आणि आपले व्हीआयपी एका बाजुला एवढी प्रचंड आहे. व्हीआयपी कल्चर हा देशातील प्रचंड वेगानं वाढत जाणारा उद्योग आहे असं निरिक्षण टाइम्स नोंदविलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here