बातमी देणं हे तर पत्रकारांचं कामच आहे.मात्र एखादी दुर्घटना घडत असताना आपल्याला चांगली बातमी मिळेल म्हणून त्याकडं दुर्लक्ष करणं हे पत्रकाराचं काम असू शकत नाही.ही जाणीव ठेवत नगरचे पत्रकार सातत्यानं आपल्यामधील सामाजिक जाणीवांचा परिचय करून देत असतात.काही दिवसांपुर्वी अपघातात जखमी झालेल्या एका महिलेला तातडीने रूग्णालयात घेऊन जाण्यार्‍या पत्रकारांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले होते.आज एकाआज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या एका शेतकर्‍याचे प्राण वाचवून केवळ बातमी देणं एवढंच काही आमचं काम नाही याचा प्रत्यय दोन पत्रकारांनी जगाला आणून दिला.

शेतकर्‍यानं वीज जोडणी आणि रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.एक शेतकरी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयन्त करतोय हे अनेकजण पहात होते.मात्र पुढं जावून त्याला रोखावं असं कोणालाही वाटलं नाही.नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई आणि ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे याच्या जेव्हा ही बाबा लक्षात आली तेव्हा ते धावले आणि त्यांनी शेतकर्‍याच्या हातातील रॉकेलचा डबा काढून घेतला.तेवढ्यात अनेकजण तिथं जमले.काय गडबड चालू आहे हे पाहून मग पोलिसही आले आणि पोलिसांनी मग त्या शेतकर्‍याला पकडून ठेवले.जागरूकता आणि समयसूचकता तसेच संवेदनशीलतेचा परिचय करून देत पत्रकारानी एका शेतकर्‍यांचे प्राण वाचविले.अन्यथा नगरमध्ये आज धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती घडणार होती.अनेकदा आपण असे बघतो की,एखादी दुदैवी घटना घडत असताना चांगली बातमी मिळेल किंवा नको त्या भानगडीत पडायला म्हणून पत्रकार दुर्लक्ष करतात.मन्सूरभाई आणि महेश देशपांडे यांनी असे केले नाही.’पत्रकारिता समाजासाठीच असावी’ ही भूमिका पार पाडत त्यांनी एका शेतकर्‍याचे प्राण वाचविले.मन्सूरभाई आणि महेश देशपांडे या दोन्ही पत्रकारांचे मनापासून अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here