अलिबागः रोजगारासाठी रायगड जिल्हयातून होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी जलस्त्रोताचे बळकटीकरण,दुग्धोत्पादनास चालना देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याची माहिती राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग ,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा कृषी महोत्सव आणि महिला स्वयंसहाय्यता गटांचा शेतमाल विक्री मेळाव्याचे पनवेलनजिक खांदेश्‍वर रेल्वे स्थानकानजिक कामोठे येथे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्दघाटन चव्हाण यांच्या हस्ते आज कऱण्यात आले.त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.हा महोत्सव 26 तारखेपर्यंत चालणार आहे.कार्यक्रमास जिल्हयातील पदाधिकारी ,अधिकारी उपस्थित होते.
या महोत्सवात माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य वर्गणीदार स्टॉल लावण्यात आला आहे.पालकमंत्र्यांनी या स्टॉलला भेट धदिली.जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here