द्रुतगती मागार्वर वाटमारी वाढली

0
781

अलिबाग- मुंबई-पुणे ए्क्स्प्रेस हाय वे वर शनिवारी पहाटे अहमदनगरच्या एका व्यापाऱ्याला ३६ लाख रूपयांना लुटल्यानंतर आणि दोन दिवसानंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्यामुळे एक्स्प्रेस वे वरील प्रवाशा्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे,गाड्या अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडंचं साहित्य पळवून नेणं, मांडप बोगद्रयाजवळ गाड्या अडवून लुटमार करणे, गाड्यातून बॅगा पळविणे,माॅलवर उभ्या असलेल्या कार मधून लॅपटाॅप किंवा तत्सम वस्तू चोरणे आदि घटना द्रुतगती मागार्सावर सातत्यानं घडत आहेत.एकट्या खालापूर आणि खोपोली पोलिसांच्या हद्दीत गेल्या दोन वषार्त,लुटमार आणि दरोड्याच्या चाळीस मोठ्या घटना घडल्याचे समोर आले आहे.यामध्ये लोणावळा आणि पुणे पोलिसांच्या हद्दीतील घटनांचा समावेश नाही.प्रवाश्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रायगड आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here