अधिवेशनः एकाच ठिकाणी २हजार पत्रकारांची निवास व्यवस्था
मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं अधिवेशन येत्या ६ आणि ७ जून रोजी पिंपरी-चिंचवडल ा होत असून अधिवशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे.काल आम्ही निवासाच्या जागेची पाहणी केली.जागा उत्तम आहे.व्यवस्था पाहून मी तरी बुवा खुष झालो.नव्यानं बांधलेल्या आठ इमारती तीन दिवसांसाठी आपण ताब्यात घेत आहोत.तेथे २००० पत्रकारांची व्यवस्था होऊ शकेल. पुण्यात एकाच ठिकाणी दोन त्रकारांची व्यवस्था होत आहे हे देखील खरं वाटत नाही.पण स्थानिक संयोजकांनी ते केलंय.  एका फ्ल्रटमध्ये चार पत्रकार थांबण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.कायर्क्रम स्थळ आणि निवास व्यवस्था हे अंतर सहा किलो मिटरचं असलं तरी वाहन व्यवस्था असल्यानं अडचण येणार नाही .निवंास व्यवस्था चााग ली केल्याबद्ल संयोजक बापूसाहेब गोरे आणि बाळासाहेब ढसाळ याना धन्यवाद दिले पाहिजेत.खाली ज्या इमारतीचे चित्र आहे त्याच ठिकाणी निवास व्यवस्था केली गेलेली आहे.
आणखी एक महत्वाची सूचना.ज्या लांडगे सभागृहात कायर्क्रम आहोत आहे.तेथील क्षमता ११००ची आहे.अधिवेशनास २२०० ते २५०० पत्रकार येतील असा अंदाज आहे.त्यामुळं उशिरा येणाऱ्या पत्रकारांना हाॅलच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या एलईडीवरूनच काय्रक्रम पाहता येईल.विनंती अशी की,पत्रकारांनी वेळेत आसनस्थ व्हायचंय.पहिल्या चार रांगा व्हीआयपी,तसेच परिषदेच्या जिल्हा अध्यक्षांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत याची कृपया नोंद घ्यावी.कायर्क्रम बरोबर दहा वाजता सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY