रायगडला धोका

0
725

पावसाळा  जवळ आला तरी आपत्ती निवारणासाठी पुरेसा निधी न आल्यानं रायगड जिल्हयातील १५ पैकी ११ तालुक्यातील २३२ गावांत राहणाऱ्या ३ लाख ५६ हजार१८४ ग्रामस्थांवर भितीची टांगती तलवार कायम आहे.
रायगड जिल्हयात २००५मध्ये झालेली अतिवृष्टी आणि दरडी काेसळल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.त्या पाश्वर्भूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती निवारणासाठी निधी मिळण्यासंबंधीचे वेगवेगळे प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारला पाठविण्यात आले होते.मात्र त्यापैकी फारच थोडी रक्कम मिळाल्यानं आपत्ती निवारणाची कामं होऊ शकली नाही.दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या  काही गावाचं पुनवर्सन,कुंडलिका आणि सावित्री नदीतील मातीची बेटं साफ करणे,नद्यांमधील गाळ काढणे आदि कामं होणं अपेक्षित होतं प ण निधी अभावी ही कामं होऊ शकली नाहीत.त्यामुळं रायगडच्या मोठ्या भागातील नागरिकांच्या डोक्यावरील भितीची टांगती तलवार कायम असल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here