जि.पची कोकणातील पहीली iso  शाळा

0
2097

कोकणात प्रथमच रायगड जिल्ह्यातील म्हसऴा तालुक्यातील तोंडसुरे गावातील जिल्हापरिषदेची शाळा आयएसओ प्रमाणित झाली आहे. स्वच्छ, सुंदर आणि संस्काराचे बाळकडू पाजणारी आणि संपूर्ण ग्रामस्थांनी जणू दत्तक घेतलेली तोंडसुरे शाळा पाहायला आतात अऩेक जण गर्दी करू लागले आहेत.
शाळेचं महत्व सांगणारी बोधवाक्य, त्याला सुयोग्य चित्र आणि ही सारी चित्र शाळेच्या प्रवेशद्वाराच्या लांबलचक भिंतीवर दूरूनच पाहायला मिळतात ती शाळा म्हणजेच रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालूक्यातील तोंडसुरे जि.प. शाळा. आता या शाळेची ओळख या पलिकडे जाऊन आयएसओ प्रमाणीत अशी झाल्याने रायगड जिल्ह्यासह सारा कोकण तोंडसुरे शाळेकडे प्रेरणास्थान म्हणून पाहत आहे. बाग बगिचा, भाजीपाला लागवड, ध्यानधारणा कक्ष, छोटं पण नेटकं मैदान, गांडूळ खताचा प्रयोग, रूम टू रीड संस्थेचा पुस्तकांचा खजिना, संगणक कक्ष, पालकांसाठी व शिक्षकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या तक्रार पेट्या, सुंदर व देखणे कारंजे, मुलांसाठी पाळणे, झोपाळे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, आणि सर्वात महत्वाची म्हणजेॆ तोंडसुरे ग्रामस्थांची कायमची सोबत या वैशिष्ट्यामुळे तोंडसुरे शाळेचे नाव आयएसओ मध्ये नोंदले गेले आहे.
तोंडसुरे शाळेने आपली गुणवत्ता आणि आपलं उच्च स्थान पटकावले असलं तरी रायगड जिल्हा परिषदेने या शाळेच्या दुरुस्तीकडे काही अंशी दुर्लक्ष केल्याचे दिसते. अजूनही इमारतीसाठी येथील शिक्षकांना मदतीची गरज आहे.
म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे सारख्या अजूनही काही शाळा आएसओ प्रमाणित होण्याकडे झेपावत असताना प्रत्येक गावातील शाळांनी आपला गुणवत्ता आलेख हा उंच ठेवला तर गावातील लोकांचा ओढा शाळेकडे वाढतो आणि तेव्हाच शाळांची प्रगती होते म्हणून प्रत्येक शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे असे येथे म्हटले जात आहे.
म्हसळा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी यावर प्रतिक्रीया देताना या गावातील लोकांच्या योगदानाला विशेष महत्व असल्याचे सांगितले.
तोंडसुरे शाळा ही आता रायगड जिल्ह्यासह कोकणात एक प्रदर्शनीय शाळा ठरेल. गावाची एकता ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी किती आवश्यक आहे हे तोंडसुरे गावाने दाखवून दिले आहे. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील वाळीत प्रकरणातील गावातील वादापुढे तोंडसुरे गावाने हा एक चांगला आदर्श पुढे ठेवला आहे एवढं नक्की.

(दिपक शिंदे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here