जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
802

लिबाग : पेण तालुक्यातील १५ गावांना पाणी व रस्ता या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शुक्र वारी खारेपाटातील पंचक्र ोशी ग्रामविकास चळवळीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
पेण तालुक्यातील कोळवे, बेणेघाट, शिंगणवट, बोरी, शिर्की, बोर्वे, बेडी, मसद बुद्रुक, मसद खुर्द, मसद बेडी, सरेभाग, सागरवाडी, दरबारवाडी, दत्तवाडी, उडाफा, गौळणवाडी, शिर्की चाळ नंबर एक व दोन परिसरातील गावांना गेल्या २0 ते २५ वर्षांपासून रस्ते, पाणी, खारबंदिस्ती अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे. दक्षिण शहापाडा योजनेत कोलेटी ते शिर्की चाळ परिसरातील ४२ गावे व २८ वाड्यांचा समावेश आहे. जलशुध्दीकेंद्राबरोबरच आमटेम, देवळी, कारावी, वडखळ व शिर्की येथे साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र १९९८ पासून ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही, असा निवेदनात उल्लेख केला आहे. या योजना १७ वर्षे होऊनही प्रलंबित आहेत. याला जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी हेटविणे ते शिर्की चाळ नंबर दोनच्या टोकापर्यंत २४ इंच व्यासाची पाइप लाइन जमिनीच्या दोन फूट उंचीवरून टाकण्यात यावी, ही योजना मंजूर होईपर्यंत कोळवे ते शिर्की चाळ या परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, हेटवणे ते शहापाडा कालवा पूर्ण झाला आहे. या कालव्यातून पाणी सोडण्यात येत नाही. यावर उपाय म्हणून कालव्यात पाइप टाकून शहापाडापर्यंत पाइप जोडावेत. खारलँड खात्याकडून बंदिस्तीची दुरु स्ती करावी, दक्षिण शहापाडा योजनेच्या दिरंगाईबद्दल अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
शिर्की येथून अलिबागपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर क्रीडा भुवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पंचक्रोशी ग्रामविकास चळवळीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला हंडा मोर्चा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here