कोकण रेल्वे मार्गावर हमसफर अतिजलद गाडी सुरू करणार-प्रभू

0
994

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर,वेगवान आणि आरामदायक व्हावा यासाठी अनेक सुधारणा केल्या जात असून या मार्गावर हमसफर ही अतिजलद गाडी सुरू कऱण्यात येत असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रायगड जिल्हायतील इंदापूर येथे दिली.
इंदापूर आणि महाड तालुक्यातील सापेवामने येथे क्रासिंग  रेल्वे स्थानकाच्या  कामांचे  भूमीपूजन आणि कोनशिला समारंभ आज रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते.इंदापूर आणि सापेवामने येथे वेटिंग हॉल आणि करंट बुकींग व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या प्रस्तावित  अनेक उपक्रमांची माहिती दिली.कोकण रेल्वे मार्गावर प्लॅटफॅ ार्म वाढविणे,वसई विरार- पनवेल हा नवा रेल्वे कॉरिडोर तयार करणे,रेल्वे स्थानकासभोवतालच्या रिक्त जागांवर उद्यानं उभी कऱणे आदिं योजना राबविणयात येणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.कोकणात रेल्वेचे सुटे भाग भाग तयार करण्याचा काराखाना सुरू केला जात असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.तसेच स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तुना बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.
यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते,खासदार विनायक राऊत,आमदार भरत सदावर्ते तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here