अलिबाग लोकलने जोडणार,गुरूवारी दिल्लीत बैठक 

0
731
 
रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागला रेल्वेने मुंबईशी जोडण्याचे अलिबागकरांचे जुने स्वप्न आता प्रत्यक्षात येत असल्याची चिन्हे आहेत.मुबई- अलिबाग लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी येत्या गुरूवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याची माहिती अवजड उद्योग मत्री अनंत गीते यांनी काल इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात दिली.या बैठकीत पेण- थळ या दरम्यान असलेल्या आरसीएफच्या रेल्वे मार्गावरून लोकल सुरू करण्याचा अंतीम निर्णय होईल अशी आशा गीते यांनी व्यक्त केली आहे.पेण-ते थळ या दरम्यान गेली पंचवीस वर्षे मालवाहतुकीसाठी रेल्वेसेवा सुरू आहे.या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करावी अशी मागणी अलिबागकर गेली अनेक वर्षे करीत आहेत मात्र ही मागणी कोणी गांभीर्याने घेतली नव्हती.मात्र आता गीते यांच्या घोषणेने गुरूवारच्या बैठकीकडे अलिबाग तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.हा रेल्वे मार्ग करताना स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच भूसंपादन करावे अशी मागणी केली जात आहे.नियोजित पेण-थळ मार्गावरील किमान पंचवीस गावांतील शेतकर्‍यांचे जमिनीचे काही प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here