मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त
20 जिल्हयात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं

मुंबईः महाराष्ट्रात आज पाच हजारांवर पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली.राज्याच्या 20 जिल्हयात आणि 200 वर तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं पार पडली.मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन आज पत्रकार आरोग्य दिन म्हणून राज्यभर साजरा केला गेला.त्यानिमित्त राज्यभर आरोग्य तपासणी शिबिरं घ्यावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केले होते.त्याला राज्यभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात पत्रकारांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरं घेऊन आपल्या प्रकृत्तीची तपासणी करून घेतली.राज्यातील किमान 20 जिल्हयात ही आरोग्य तपासणी शिबिरं घेतली गेली.काही जिल्हयात उद्या तर काही ठिकाणी परवा ही शिबिरं होत आहेत.राज्यात गेल्या अकरा महिन्यात दहा पत्रकारांचे ह्रदयक्रिया बंद पडून किंवा तत्सम आजाराने अचानक निधन झाले आहे.गत वर्षी देखील नऊ पत्रकार ह्रदयविकाराचे शिकार झाले होते.त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेने दोन वर्षांपासून वर्धापन दिन हा पत्रकार आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आज राज्य भरातून किमान पाच हजार पत्रकारांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.परिषदेचा हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हा ,तालुका संध तसचे सर्व पत्रकार मित्रांना धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here