कॉरिडॉरला रायगडात विरोध

0
1747

अलिबाग- दिल्ली -मुंबई आौद्योगिक कॉरिडॉरमध्ये दिघी बंदराचा समावेश करून रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर संपादिक केल्या जाणाऱ्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होत असून काल माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.सरकारने देऊ केलेले पॅकेजही आम्हाला मान्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती शेतकरी नेत्या उल्का महाजन यांनी दिली.
रायगड जिल्हयातील माणगाव,तळा आणि रोहा तालुक्यातील 71 गावातील 9 हजार हेक्टर जमिन कॉरिडॉरसाठी संपादित केली जाणार आहे.त्यासाठी सरकारने एकरी 18 लाख 44 हजार रूपयांचा दर देऊ केला आहे.ज्या शेतकऱ्यांना विकसित भूखंड हवे आहेत त्यांना एकरी 13 लाखाचा दर दिला जाणार आहे.मात्र सरकारचे हे पॅकेज आम्हाला मान्य नसून कोणत्याही किंमतीला आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत कारण हा प्रकल्प कष्टकरी जनतेच्या हिताचा नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.कॉरिडॉरच्या विरोधात शेतकरी आता जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here