दरवाढीबरोबरच रायगडात रक्तटंचाई

0
742
डेंग्यु आणि साथीच्या अन्य आजारामुळे रक्ताची मागणी वाढलेली असतानाच एकीकडं रक्ताचा मोठ्‌या प्रमाणावर जाणवणारा  तुटवडा आणि दुसरीकडे रक्ताच्या पिशवीच्या दरात झालेली भरमसाठ वाढ यामुळं रक्ताची गरज भागवताना रायगड जिल्हयात रूग्णाच्या नातेवाईकांची दमछाक होताना दिसते आहे.राज्य सरकारने रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत तब्बल अडिचपट वाढ कऱण्यास नुकतीच मान्यता दिल्याने सरकारी रूग्णालयात 450 रूपयांना मिळणारी रक्ताची पिशवी आता थेट 1 हजार 50 रूपयांना उपलब्ध करून दिली जात आहे.सरकारी रक्तपेढीतील दर वाढल्याने   खासगी रक्तपेढीतील रक्ताच्या पिशवीची किंमत 2 हजार रूपयांच्या वर पोहोचली आहे.निकड पाहून हे दर वाढविण्यात येत असल्याच्या तक्रारीही केल्या जात आहेत.रक्त साठवणूक आणि  सुरक्षा चाचण्या यांचा खर्च वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात असले तरी मुळातच प्राथमिक आरोग्य सेवांचा खर्च परवडत नसलेल्या रूग्णांना झालेली अडिचपट दरवाढ असहय ठऱणारी आहे.हे दर सामांन्य रूग्णाच्या आवाक्याबाहेरचे आहेत अशी तक्रार आता  नागरिक करू लागले आहेत.
रक्ताची मागणी वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रूग्णालयातही मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असून ए निगेटीव्ह,एबी निगेटीव्ह ए पॉझिटीव्ह,बी निगेटीव्ह,ओ निगेटीव्हच्या रक्ताची एखाद-दुसरीच पिशवीच जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत  शिल्लक आहे.जमा केले गेलेेले रक्त 35 दिवसात वापरावे लागते.त्यामुळं रक्ताचा साठा करता येत नाही असं  रूग्णालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.रूग्णालयातील रक्तचा पुरवठा नियमित राहावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसंकलन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here