जागतिक किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्तानं काल रायगड जिल्हयातील मुरूड.काशीद आणि अलिबाग किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलाच्यावतीनं किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.या मोहिमेत स्थानिक नागरिक,मच्छिमार बांधव,स्थानिक प्रशासन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेऊन किनारे चकाचक केले.
स्वच्छता मोहिमेचा आरंभ रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी कचरा गोळा करून केले.यावेळी बोलताना मुरूड जंजिरा येथील तटरक्षक तळाचे डेप्युटी कमांडर अनुज निर्वाल यांंंंंनी अशा प्रकारची स्वच्छता मोहिम देशभरातील किनाऱ्यावर राबविली जात असून या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन केले..
स्वच्छता मोहिमेसाठी तटरक्षक दलाचे महाकाय अत्याधुनिक हॉवरक्राफ्ट समुद्र किनारी आणले गेले होते.यावेळी पाण्यावर तरंगनारा कचरा,प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या,थर्माकोल,मद्याच्या बाटल्या,पुजेचे निर्मालय,पेप्सीचे पॅकेट वंगन अशा प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा कऱण्यात आला.यावेळी कचरा आम्ही समुद्रात टाकणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली

LEAVE A REPLY