एकटया अलिबाग तालुक्यात 324 जातीचे पक्षी 

0
1077
अलिबाग तालुक्यात विविध जातींच्या पक्ष्यांची संख्या 324 एवढी असल्याचे आढळून आले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्यावतीने दर वर्षी 15 नोव्हेंबर या पक्षीमित्र सलीम अली यांच्या जन्मदिनी पक्षी गणना करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार अलिबाग तालुक्यातील पक्ष्यांची गणना करण्यात आली एकट्या अलिबाग तालुक्यात 324 जातीचे पक्षी आढळतात तर इंग्लडमध्ये 300 जातीचे पक्षी दृष्टीस पडतात.याचा अर्थ इग्लंडपेक्षा जास्त जातीचे पक्षी अलिबाग तालुक्यात आढळतात.अशी माहिती ज्येष्ट पक्षी मित्र डॉक्टर वैभव देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
  अलिबाग तालुक्यातील 324 जातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे घेऊन त्याची नोंद जागतीक स्तरावर नोंदणी करणार्‍या विविध वेबसाईटवर केली गेली आहे.-ज्येष्ठ पक्षीमित्र डॉक्ेटर सलीम अली यांचे दीर्घकाळ वास्तव्य अलिबाग तालुक्यातील किहिम येथे होते.त्यांनीही अलिबाग तालुक्यातील पक्ष्यांच्या नोंदी केलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here