रायगड- निवडणूक यंत्रणा सज्ज

0
728

रायगड लोकसभा मतदार संघात उद्या गुरूवारी होत असलेल्या मतदानासाठीची प्रशासकीय पातळीवरची सारी तयारी पूर्ण झाली असून आज सकाळपासूनच मतदान केंदावरील कर्मचारी ,मतदानाचे साहित्या घेऊन आपआपल्या मतदान केंदा्रकंड कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली आहेत.

रायगड मतदार संघातील 15 लाख 13 हजार 608 मतदारांना मतदान करण्यासाठी 2119 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी 13 हजार 606 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यात 265 सेक्टर ऑफिसर आणि 2हजार650 प्रोसायडिंग ऑफिसरचा समावेश आहे.जनरल निरिक्षक अजय शर्मा आणि खर्च निरिक्षक विनोद चक्रवर्ती आणि निवडणूक निर्णय़ अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुमंत भांगे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊऩ आहेत.जिल्हयात 125 संवेदनशील तर 19 अतिसंवेदनशील किंवा क्रिटीकल मतदान केंद्रं असून तेथे सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.कायदा आणि सुव्यवस्थाटा र्रष्न निर्माण होऊ नये याासाठी अडिच हजार पोलिस,होमगार्ड आणि एसआरपीची तैनात केले गेल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here