आ. पाटील यांच्या विरोधात  गुन्हा

0
772

लोकसभा निवडणुकीच्या काळात रायगड मतदार संघातील अर्जाची छाननीच्या दिवशी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चढया आवाजात वार्तालाप केला,एवढेच नव्हे तर निवडणुकीच्या कामात अडथळा आणला असल्याचा ठपका ठेऊन स्वतः जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात काल तक्रार नोंदविली आहे.7 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता.या प्रकरणी अलिबाग पोलिसंानी तक्रार नोंदवून घेतली असून आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 186 आणि 189 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती अलिबाग पोलिसांनी  दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here