माध्यम स्वातंत्र्याची एैसी की …

0
676

भारतीय घटनेनं वृत्तपत्र स्वातंत्र्य मान्य केलं आहे.मात्र अलिकडच्या काळात या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसतो आहे.माध्यमांवर विविध प्रकारेच निर्बन्ध लावून प्रसंगी धमक्या देऊन अथवा पत्रकारांवर हल्ले करून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रय़त्न होताना दिसतो.भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कसा हल्ला होतोय हे आता जगाच्याही नजरेस आलं आहे.

वॉश्ंिगटनमध्ये फ्रीडम हाऊस रिपोर्ट नावाची संस्था कार्यरत आहे.हे जगाच्या वेगवेगळ्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्याची स्थिती काय आहे याचा अभ्यास करीत असते.दरवर्षी त्याचे रिपोर्ट प्रसिध्द होतात.संस्थेने आपला अहवाल नुकताच प्रशिध्द केला असूून त्यात भारतातील माध्यम स्वातंत्र्याची रॅकिंग घटल्याचे समोर आलं आहे.भारत आता 78 व्या स्थानावर पोहोचला आहे.पाकिस्तान 141 व्या स्थानावर आहे.
197 देशांचा या पाहणीत समावेश केला गेलाय.1980 पासून संस्था हे काम करते.
त्यांची तीन गटात विभागणी केलीय.पहिला गट ज्या देशात वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे असा आहे.दुसरा गट ज्या देशात वृत्तपत्रांना अंशतः स्वातंत्र्य आहे असा आहे तर तिसरा गट ज्या देशात वृत्तपत्रांना अजिबात स्वातंत्र्य नाही असा आहे.यामध्ये शून्यापासून ( सर्वात चांगली स्थिती) 100 पॉंईंटपर्यत ( सर्वात वाईट स्थिती ) अशी मोजणी केली जाते.गेल्या वेळच्या तुलनेत भारताचा एक पॉंईट कमी झाला असून तो आता 39 पॉईंट झाला आहे.या पॉईंटनुसार भारत 78 व्या स्थानावर फेकला गेलाय. भारत सध्या अंशतः माध्यम स्वातंत्र्य असलेल्या देशात समाविष्ट केला गेला आहे.
चीन अजिबात वृत्तपत्र स्वातंत्र्‌ नसलेल्या देशांच्या श्रेणीत आहे.म्यानमार आणि नेपाळमधील परिस्थिती सुधारलेी आहे तर क्युबा गिनी,ईराण,उत्तर कोरिया,तुर्कस्तान,उजबेगिस्तान हे देश सर्वात खराब अवस्थेत दाखविले गेले आहेत.म्हणजे या देशात वृत्तपत्र स्वांंतंत्र्य शिलल्क नसल्याचे सांगितले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here