आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या रॅलीत

0
748

रोहा  – रोहयातील नगराध्यक्षपदाचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार संदीप तटकरे यांच्या प्रचार रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे आणि त्यांच्या मातोश्री शुभदा तटकरे सहभागी झाल्याने रोहत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधातच आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या बाजुने  मैदानात उतरल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.

संदीप तटकरे यांनी परवाच मुंबईत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.त्यावेळी अनुपस्थित असलेले आमदार अवधूत तटकरे काल रोह्यातील मिरवणुकीत मात्र भावाच्याबरोबर दिसले आहेत.तटकरे यांच्या घरातील ही भाऊबंदकी सध्या रायगडमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here