आंबा आंबा कोपली

0
836
 
अलिबागः काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागोठण्यात आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.नदीचे पाणी एस.टी.बस स्थानक,कोळीवाडा,मरी आई मंदीर, पसरले आहे,. पुराचे पाणी नागोठणे रोहा जुना मार्ग  आणि नागोठणे पेण माार्गावरही पसरले असल्याने हे मार्ग बंद झाले आहेत.त्यामुळे नागरिकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरूवात केली आहे.पाली -वाकण दरम्यानच्या पुलावर पालीत पुलावर पाणी असल्याने नागोठणे- खोपोली मार्गही बंद कऱण्यात आला असून ही वाहतूक वडखळ -पेण मार्गे वळविण्यात आली आहे.
आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याची या पावसाळ्यातलली ही पहिलीच वेळ आहे.1989 आणि 2005 मध्ये आंबा नदीला आलेल्या महापुराने नागोठण्यात मोठा हाहाकार उडाला होता. काल रायगडमध्ये 760.30 मिली मिटर पाऊस पडला असून त्याची सरासरी 47.52 मिली मिटर एवढी आहे.जिल्हयात आतापर्यंत सरासरी 3442.26 मिली मिटर पाऊस झाला आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here