मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ महासंचालकांना भेटले

0
1368

मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ 

महासंचालकांना  भेटले

पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांबाबत ब्रिजेश सिंग यांचा सकारात्मक प्रतिसाद 

 राठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी नवनिर्वाचित माहिती महासंचालक तथा विभागाचे सचिव श्री.ब्रिजेश सिंग यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या दीर्घकाल प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांवर तसेच अधिस्वीकृती समितीच्या कार्यपध्दतीबाबत वीस मिनिटे चर्चा केली.ही चर्चा सकारात्मक झाली असून पत्रकारांच्या प्रश्‍नांच्या संदर्भात श्री ब्रिजेश सिंग फारच सकारात्मक दिसले.पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा माहिती जनसंपर्क ने तयार केला असून तो दीर्घकाळ विभागातच धुळ खात पडला होता.श्री. ब्रिजेश सिंग यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ही फाईल आता गृह विभागाकडे गेली असून पुढील कारवाईला सुरूवात झाल्याचे ब्रिजेश सिंग यांनी स्पष्ट केले.या बरोबरच पेन्शनच्या प्रश्‍नावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार आरोग्य योजनेत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय ब्रिजेश सिंग आल्यानंतर घेतला असला तरी या योजनेत केवळ 22 आजारांसाठीच मदत दिली जाते,ती सर्व प्रकारच्या आजारांना मिळावी अशी मागणी शिष्ट मंडळाने  यावेळी सचिवांकडे केली.तसेच ज्यांना अधिस्वीकृती नाही पण जे अधिस्वीकृतीसाठी पात्र आहेत अशा पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी विनंतीही शिष्टमंडळाने सचिवांकडे केली आहे.

अधिस्वीकृती समितीच्या संदर्भात अनेक बाबी सचिवांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या.अधिस्वीकृती समितीला कोणताही नवा निमय करण्याचा अधिकार नाही,ही समिती केवळ सरकारकडे शिफारस करू शकते हे वास्तव ब्रिजेश सिंग यांनी स्पष्ट केले..वयाची अट पूर्ण न करणार्‍या राज्यातील 54 पत्रकारांना नियमाकडे हेतुतः डोळेझाक करीत कशा पध्दतीने कार्ड दिले आहेत हे देखील माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीसह सचिवांच्या निदर्शनास आणून दिले गेले.( निमयमांकडे डोळेझाक करून वाटलेली कार्ड रद्द करावीत अशी मराठी पत्रकार परिषदेची भूमिका नाही . कारण  यातील बहुतेकजण आज वयाने साठी पूर्ण केलेले आहेत.मात्र  यापुढे नियमांकडे दुर्लक्ष करून कामकाजे केले जावू नये असा आग्रह शिष्टमंडळाने सचिवांकडे धरला.तो त्यांनी मान्य केला आहे.) गुन्हे दाखल असलेल्या मालकाचे कार्ड वाचविण्यासाठी निमय बाजुला ठेऊन ज्या पध्दतीने कार्डाचे वाटप करण्यात आले आहे ती बाबही महासंचालकांच्या सप्रमाण नजरेस आणून दिली गेली.इतिवृत्ताच्या संदर्भातला पोरखेळ, एस.एम.देशमुख यांना इतिवृत्त,अजेंडा मिळू नये म्हणून अर्धवट पत्त्यावर टपाल पाठविण्याचा सुरू असलेला बालिशपणा ( ही बाब संचालक श्री.मानकर यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर देशमुख याना  इ-मेलने काल शिर्डी बैठकीचा अजेंडा पाठविला गेला.टपालाने  आजही अजेंडा मिळालेला नाही.तसेच अन्य सर्व सदस्यांना प्रवास खर्चाची बिले मिळाली आहेत मात्र  एस.एम.देशमुख यांना अजून एकाही बैठकीची बिले जाणीवपूर्वक दिली गेली नाहीत.ही बाब दोन वेळा श्री.मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली.म्हणजे नियमानुसार कामकाज चालावे आणि जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळाली पाहिजे यासाठी जे आग्रह धरतात त्यांची सर्व प्रकारे  कोंडी करण्याचा प्रयत्न अधिकारी पातळीवर  सुरू आहे.) आदि बाबीदेखील महासंचालकांच्या नजरेस आणून दिल्या गेल्या.पुण्याच्या सांजवार्ता दैनिकाचे संपादक विनोद कुलकर्णी यांनीही कट-कारस्थान करून आपले अधिस्वीकृती कार्ड कसे रद्द केले  गेले आणि आपल्यावर कसा अन्याय केला गेला हे विविध पुराव्यांसह सचिवांच्या नजरेस आणून दिले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत समितीचे कामकाज नियमानुसारच चालेल या संबंधीच्या सूचना मी सदस्य सचिवांना देत असल्याचे ब्रिजेश सिंग यांनी सांगितले. पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांवर दाखल केल्या जात असलेल्या खोट्या केसेस दाखल करून राज्यातील पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा होत असलेल्या प्रयत्नांच्या निषेधार्थ येत्या 2 ऑक्टोबर रोजी राज्यातील पत्रकार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत असून निर्धार मोर्चे काढून आपला संताप व्यक्त करणार असल्याची बाबही लेखी स्वरूपात महासंचालकांच्या नजरेस आणून दिली गेली.पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन,पत्रकार आरोग्य योजना, आदी प्रश्नाबरोबरच छोटया वृत्तपत्रांसाठीचे जाहिरात धोरण,राज्यातील प्रलंबित पत्रकार भवनं,गृह निमाण योजना,मजिठियांची अंमलबजावणी कऱण्यास होत असलेली टाळाटाळ आदि प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा झाली

महासंचालकांच्या अत्यंत सकारात्मक भूमिकेबद्दल,आणि पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्याबाबत त्यांनी दाखविलेल्या प्रतिसादाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी ब्रिजेश सिंग यांनी एस.एम.देशमुख आणि विनोद कुलकर्णी यांना लोकराज्य आणि अन्य  अंक भेट दिले.

एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महासंचालकांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागाचे माजी अध्यक्ष ,ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी,ज्येष्ट पत्रकार शशिकांत सांडभोर आदिंचा समावेश होता.

( मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here