रायगड – निवडणुकांबद्दल सारं काही…

0
1230

रायगड निवडणुकांबद्दल सारं काही…

रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आणि 15 पंचायत समितीच्या 118 जागांसाठी येत्या 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.या निवडणुकांच्या दृष्टीनं महत्वाची माहिती येथे देत आहोत.

रायगडचे क्षेत्रफळ ः

7,148 चौ.कि.मी.

विस्तार पूर्व-पश्‍चिम –      

25.50 किलो मिटर

दक्षिण -उत्तर

160 किलो मिटर

तालुके          

15 तालुके ( अलिबाग,उरण,खालापूर ,सुधागड,तळे,पनवेल,पोलादपूर,महाड,माणगाव,  मुरूड,म्हसळा,श्रीवर्धन,कर्जत,पेण,रोहा )

एमआयडीसी    

पेण,महाड,पाली,तळे,वायशेत,रासायनी,खोपोली,रोहा ,   नागोठणे,महाड

 रायगडची लोकसंख्या ः(2001)        

एकूण                 2,20,7929

पुरूष ः             11,17628

महिला ः            1090301

शहरी                   534835

ग्रामीण                16,7394

 सेडयुल कास्ट लोकसंख्या ः   53667

सेडयुल ट्राइब                     269124

सुशिक्षित  लोकसंख्या         14,58324

( पुरूष ः 822913 महिलाः635411)

 एकूण         ७७ सुशिक्षित

 पुरूष ः       ८६. १

 महिलाः     ६७..७

जिल्हयातील तालुके      15

जिल्हयातील शहर        १६

एकूण खेडी           1970

ग्रामपंचायती        821

भाषा        ः   मराठी

जिल्हयातील विधानसभा मतदार संघ –    

1) अलिबाग-मुरूड 2) पनवेल 3) उरण 4)रोहा-श्रीवर्धन-म्हसळा 5) पेण-सुधागड  6) कर्जतःखालापूर 7) महाड-पोलादपूर

लोकसभा मतदार संघ    

1) रायगड 2) मावळ ( उरण-पनवेलःखालापूर )

रायगड जिल्हा परिषद सदस्य संख्या

59

(रायगड जिल्हा परिषदेची अगोदर सदस्य संख्या 6 2 होती मात्र यावेळी ती तीनने कमी होणार आहे.कार पनवेल महापालिका झाल्याने आणि पनवेल तालुक्यातील जवळपास 32 गावांचा महापालिकेत   समावेश झाल्यानं तीन मतदार संघ कमी झाले आहेत.)

पंचायत समित्यांची संख्या

15

पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड-पाली, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगांव, श्रीवर्धन,  महाड, पोलादपूर, म्हसळा

पंचायत समिती सदस्य

118

महिला राज येणार

 रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी  महिलेसाठी राखीव असून पंधरा पैकी 8 पंचायत समितीवर    देखील महिला राज येणार आहे.पडलेले आरक्षण खालील प्रमाणे

 सर्वसाधारण वर्ग ः               तळा,माणगाव,कर्जत,महाड

  सर्वसाधारण महिलाः              मुरूड,म्हसळा,खालापूर,श्रीवर्धन

 नागरिकांचा मागास प्रवर्ग ः     उरण-सुधागड-पाली

  नागिराकांचा मा.वर्ग.महिला       पनवेल,रोहा

   अनुसुचीत जाती महिला            पाोलादपूर

 अनुसुचीत जमाती                       अलिबाग

   अनुसुचित जमाती महिला            पेण

58 उमेदवारी अर्ज बात                                       

 रायगड जिल्हयात जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठ  आलेल्या 363  अर्जांपैकी 18 अर्ज बाद झाले तर पंचायत                      समितीच्या 118 जागांसाठी आलेल्या 666 अर्जापैकी 40   अर्ज बाद झाले आहेत.एकूण 58 अर्ज बाद झाले आहेत.

रायगडमध्ये जिल्हा परिषद,पंचायत
 समितीसाठी 557 उमेदवार रिंगणात 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी मागे घेण्याच्या     आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 135 तर पंचायत  समितीच्या 238 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या 58 मतदार संघासाठी 138 तर पंचायत समितीच्या 118 मतदार संघांसाठी 374 असे मिळून 557 उमेदवार रिंगणात  उरले आहेत.म्हसळा तालुक्यातील वरवटणे जिल्हा परिषद मतदार  संघाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.त्यामुळं बहुतेक मतदार बहुरंगी  सामने होणार आहेत..–

रायगडात  14 लाख 62 हजार 889 मतदार

रायगड जिल्हयात उद्या मंगळवारी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.जिल्हयात 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समितीसाठी मतदान होत असून 14 लाख 62 हजार 889 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.त्यासाठी 1 ,940 मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत असून त्यासाठी 12 हजार 804 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होत आहे.मतदान शांततेत पार पडावे यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कऱण्यात आलेल्या असल्यानं मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांनी केले आहे.-रायगडात उद्या 14 लाख 62 हजार 889 मतदार निवडणार आपले प्रतिनिधी

रायगडात पोलीस यंत्रणा सज्ज

रायगड जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 मतदार संघात उद्या होत असलेले मतदान शांततेत पार पडावे यासाठी रायगड पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.पोलिसांनी विविध कलमांखाली 1,690 जणांवर कारवाई केली असून 70 जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे तर 401 जणांना शांतता भंग न कऱण्याबाबत नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.मतदानासाठी जिल्हाय 173 पोलिस अधिकारी तैनात कऱण्यात येणार आहेत.त्यांच्या मदतीला 1893 पोलीस कर्मचारी,550 होमगार्डस,राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी,तसेच दंगल नियंत्रण पथक आणि जलद प्रतिसाद पथक तैनात कऱण्यात आले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिलाी.
जिल्हयात जिल्हा परिषदेसाठी 114 आणि पंचायत समितीसाठी 232 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.जिल्हा परिषदेसाठी शिवसेना सर्वाधिक 46, भाजप 40, शेकाप 30, राष्ट्रवादी 26 ,कॉग्रेस 21., अपक्ष 16 आणि अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.उद्या मतदान झाल्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.

रायगडात पती-पत्नी रिंगणात 

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पती-पत्नी रिंगणात असल्याची किमया शेकापनं करून दाखविली आहे.माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पूत्र आस्वाद पाटील हे रोहयातून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या पत्नी विद्यमान अर्थ सभापती चित्रा पाटील अलिबाग तालुक्यातील दोन मतदार संघातून निवडणूक लढत आहेत.तसेच आ.पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील आणि आमदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील देखील निवडणूक रिंगणात आहेत.शिवाय शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या जिल्हा परिषदेसाठी तर कन्या जुईली दळवी या पंचायत समितीसाठी लढत आहेत.चित्रा पाटील दोन मतदार संघातून लढत आहेत.थळ मतदार संघात महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्याशी त्यांची कडवी झुंज होणार आहे.अलिबागमध्ये कॉग्रेस-शिवसेना युती असली तरी शेकापनं थळ जिल्हा परिषद गटातील दोन पंचायत समिती गणातील आपले उमेदवार मागे घेऊन कॉग्रेसला पाठिंबा दिल्याने मानसी दळवी अडचणीत आल्या आहेत.पंचायत समितीच्या बदल्यात कॉग्रेसनं शेकापला जिल्हा परिषदेसाठी मदत करावी अशी ही खेळी आहे.

जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

  जिल्हा परिषदेसाठी एकूण 59 गट  तर  पंचायत समितीसाठी 118   गण आहेत.  1 हजार 940 मतदान केंद्र आहेत.  233 झोन बनविण्यात  आले आहेत.   मतदान 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी                               5.30 पर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होणा आहे. आचार संहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय    समिती स्थापन करण्यात आली आहे.    चेकपोस्ट, भरारी पथक, व्हिडिओ                 सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात आली आहे.  चेकपोस्टवर या टीममार्फत    तपासणी करण्यात येणार आहे. पेडन्यूज संदर्भातील तक्रारी तसेच जाहिरात  प्रसारण परवानगी देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक खिडक  योजनेंतर्गत परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.   या   निवडणुकीसाठी एकूण पाच निवडणूक निरीक्षकांची नियुक्त  आहे.   संवेदनशील  मतदान केंद्राची यादी तयार करण्यात आली   असून या मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे.  निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्र जमा करण्यासाठी    जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांची कमिटी स्थापन करण्यात  आली आहे. जिल्ह्यातील निवडणूका शांततेत व निर्भयपणे पार पडाव्या     यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  पोलीस  पथकाबरोबर 450 होमगार्डची मदत घेण्यात येणार आहे.  तसेच राज्य राखी  दलाचे पोलीस टीम सुध्दा बंदोबस्तात असणार आहे.   95 पोलीस झोन तयार   करण्यात आले आहेत.   ते एक ते दीड तासात  सर्व मतदान केंद्राची तपासणी  करु करतील.  तसेच तीस लोकांच्या चार टीम तयार करण्यात आल्या असून  कुठलीही अनुसूचित घटना घडल्यास केवळ अर्धा ते एक तासात ते घटनास्थळी  पोहचू शकतात. मागील निवडणूकीचा आढावा घेऊन गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींना नोटीस देऊन तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले आहे.   तसेच   निवडणूक काळात तडीपार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे    त्यां नी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेतील विविध विभाग

      सामांन्य प्रशासन विभाग

   जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग

       अर्थ विभाग

    महिला व बाल विकास विभाग

      ग्रामपंचायत विभाग

     आरोग्य विभाग

     कृषी विभाग

    पशूसंवर्धन विभाग

   शिक्षण विभाग ( प्राथमिक)

   शिक्षण विभाग ( माध्यमिक)

   बांधकाम विभाग

    समाज कल्याण विभाग

     ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

अर्थसंकल्प ः

100कोटीचा अर्थसंकल्प असून त्यात शेती

आणि    शिक्षणासाठी विशेष तरतूद केल्याचे दिसते.

नेत्यांचे वर्चस्व

सुनील तटकरे      ( राष्ट्रवादी )          माजी मंत्री- आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटील      शेकाप                  आमदार  शेकापचे सरचिटणीस

अनंत गीते          शिवसेना               केंद्रीय मंत्री

महेंद्र दळवी       शिवसेना              जिल्हा प्रमुख

  प्रशांत ठाकूर      भाजप                    आमदार पनवेल भाजपचे जिल्हाध्यक्ष

रवीशेठ पाटील     कॉग्रेस                   माजी मंत्री

माणिक जगताप ,    मधु ठाकूर ः      कॉग्रेस ः माजी आमदार

रायगडमधील पक्षीय बलाबल

विद्यमान  जिल्हा परिषदेत पक्षनिहाय स्थिती खालील प्रमाणे आहे

रायगड जिल्हा परिषदेची सत्ता सध्या राष्ट्रवादी ःशेकाप आघाडीकडं आहे.राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.

शेकापः            19 सदस्य ( पाच पंचायत समित्या शेकापच्या ताब्यात आहेत )

राष्ट्रवादी ः    20 सदस्य  ( सहा पंचायत समित्या राष्ट्रवादीकडं आहेत)

शिवसेना ः     14 सदस्य ( एकही पंचायत समिती नाही )

कॉग्रेस   ः      7 सदस्य  (एकही पंचायत समिती नाही)

भाजप ः         1 सदस्य   ( एकही पंचायत समिती नाही)

शेकापकडं विधान परिषदेचे दोन आणि विधानसभेचे दोन असे चार आमदार आहेत

राष्ट्रवादीकडं दोन विधानसभा सदस्य आणि तीन विधान परिषद सदस्य आहेत ।( तटकरे यांच्या घरातच तीन आमदार आहेत )

शिवसेनेकडं ः  दोन खासदार ( केंद्रीय मंत्री ) आणि दोन आमदार आहेत.

कॉग्रेस      ः     एकही आमदार नाही,खासदार नाही

भाजप      ः      एक आमदार आहेत.

रायगडमध्ये सोयीनुसार युत्या-आघाडया 

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्थानिक गरज आणि परिस्थितीनुसार आघाडया आणि युत्या झाल्याचे दिसते.जिल्हयात शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.जिल्हयात शेकापने 32 तर राष्ट्रवादीने 29 उमेवार उभे केले आहेत.मतदार संघ 59 असल्यानें 14 ठिकाणी परस्परांच्या विरोधात हे पक्ष उभे असल्याचे चित्र आहे.सुनील तटकरे यांच्या कन्येच्या विरोधातही रोहयात शेकापनं उमेदवार उभा केला आहे.दुसरीकडं अलिबाग,पेण आणि कर्जतमध्ये शिवसेना – कॉग्रेस युती असली तरी उरण,श्रीवर्धन,पनवेल आणि रोहयात मात्र कॉग्रेस ,शेकाप आणि राष्ट्रवादीबरोबर आहे.महाड,पोलादपूर,माणगाव आणि म्हसळ्यात कॉग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने या तालुक्यात चौरंगी लढत अपेक्षित आहे.उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यानं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीने आदिती तटकरे,शेकापनं भावना पाटील आणि शिवसेनेने मानसी दळवी यांना उमेदवारी दिली आहे.या तीन महिला नेत्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असू शकतात.– 

रायगडातील घराणेशाही

—————————–

रायगड जिल्हा परिषदेची सत्ता सर्वाधिक काळ शेकापच्या ताब्यात राहिली.

स्व.प्रभाकर पाटील बारा वर्षे अध्यक्ष होते.त्यानंतर त्यांच्या सुनबाई सुप्रिया पाटील अध्यक्ष होत्या.

मीनाक्षी पाटील,पंडित पाटील,चित्रा पाटील जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत.चित्रा पाटील सध्या अर्थ समितीच्या सभापती आहेत.

निवडणुकीतही ही घराणेशाही दिसते आहे.

सुनील तटकरे यांच्या सुकन्या आदिती तटकरे रोह्यातील वरसेमधून निवडणूक रिंगणात आहेत.( जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने आदिती तटकरे प्रबळ दावेदार ठरू शकतात)

( माजी जि.प.अध्यक्ष शुभदा तटकरे यांना उमेदवारी दिली गेली नाही.मागे त्या आंबेवाडीतून निवडून आल्या होत्या)

शेकाप आ.पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांना शहापूरमधून उमेदवारी दिली गेलीय,

माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील रोहयातील खारगावमधून लढत आहेत.

मीनाक्षी पाटील यांच्या सुनबाई चित्रा पाटील कुर्डुस आणि थळ मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत.

आ.धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील पेणमधील पाबळमधून रिंगणात आहेत.

माजी मंत्री सेनेेचे प्रभाकर मोरे यांच्या सुनवाई वृषाली मोरे विन्हेरे मधून लढत आहेत.

माजी मंत्री रवी पाटील यांचे चिरंजीव वैकंठ पाटील पेणमधील दादरमधून रिंगणात आहेत.

माजी आमदार मधु ठाकूर यांचा मुलगा राजा ठाकूर मापगावमधून निवडणूक लढवत आहे.

शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी थळमधून रिंगणात आहेत

महेंद्र दळवी यांच्या सुकन्या जुई चेंढरे मधून रिंगणात आहेत.

रायगडमधील युती- आघाडी

—————

रायगडमध्ये कधी काळी शेकाप आणि राष्ट्रवादी हे कट्टर विरोधक होते.आज दोन्ही पक्ष अडचणीत आल्यानं ते एकत्र झाले आहेत.शेकाप-राष्ट्रवादी आघाडी जिल्हयात आहे.ती नगरपालिकेतही होती मात्र म्हणावा तेवढा फायदा तेव्हा झालेला नाही.विरोधकांची अधिकृत आघाडी नाही.मात्र स्थानिक पातळीवर काही तालुक्यात शिवसेना आणि कॉग्रेसची आघाडी झाली आहे.त्याचा चांगलाच फटका शेकाप-राष्ट्रवादीला बसू शकतो.शिवसेना जिल्हयात स्वतंत्रपणे लढत आहे.सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून तो पुढे येईल अशी शक्यता आहे.जिल्हयात राष्ट्रवादीकडं तीन नगरपालिका आहेत ( रोहा,माथेरान,श्रीवर्धन  ) शेकापकडं एक ( अलिबाग ) कॉग्रेसकडं दोन (महाड आणि पेण ) भाजपकंडं एक (उरण ) तर शिवसेनेकडं दोन ( मुरूड आणि माथेरान ) असं बलाबल आहे.मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा फार फायदा होणार नाही.ग्रामीण मतदारांचा कौल शिवसेनेला जाईल असं दिसतंय.त्यातच राष्ट्रवादीला जिल्हयातम मोठी गळती लागली आहे,विजय कवळे,राजा केणी यांच्या सारखे नेते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यानं पक्षाची ताकद वाढली आहे.आघाडीमुळं अनेकांना पक्षांची तिकीटं मिळाली नसल्यानं ते नाराज आहेत.

रायगडमधील ठळक समस्या

—————–

रस्ते

रायगड मुंबईच्या जवळचा जिल्हा असला तरी समस्यांची येथे कमतरता नाही.मुळात जिल्हयातील रस्ते धड नाहीत.मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्ग तसेच एक्स्प्रेस वे आणि पळस्पे ते उरण हा महामार्ग जिल्हयातून जातो.मात्र एक्प्रेस वेची अवस्था सोडली तरी सर्वच रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे.राज्य रस्ते आणि जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरून चालणे देखील कठीण होत असते.त्याचा मोठा फटका रायगडच्या विकासाला बसतो आहे.मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करावे या मागणीसाठी पत्रकारांनी सतत पाच वर्षे आंदोलनं केल्यानंतर आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे.

प्रदूषणः 

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो.मोठया स्वरूपाचे 248 कारखाने आणि छोटे 2210 कारखाने जिल्हयात आहेत.यातील बहुतेक कारखाने रासायनिक  असल्यानं मोठया प्रमाणात वायू आणि जल प्रदूषण ही मोठी समस्या जिल्हयात आहे.प्रक्रिया केलेले सांडपाणी सावित्री,पाताळगंगा,अांबा,कुंडलिका,गाढी,गांधारी,उल्हास आादि प्रमुख नद्यांतून सोडले जात असल्यानं या नद्या गटारगंगा झालेल्या आहेत.या विरोधात सर्वच राजकीय पक्षांचे मौन आहे.वायू प्रदूषणही मोठया प्रमाणात आहे.मोठ्या कारखान्याचे धुराडे दिवसरात्र जिल्हयात प्रदूषण करीत असतात याचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.

वाढते अपघात

रायगडमध्ये अरूंद तसेच खराब रस्ते,वाढलेली भरमसाठ वाहतूक यामुळं रायगडचे रस्ते म्हणजे मृत्यूचे सापळे झाले आहेत.जिल्हयात 2016 मध्ये झालेल्या 1 हजार 151 अपघातांमध्ये 301 लोकांना आपले प्राम गमवावे लागले आहेत.874 जण गंभीर जखमी झाले आहेत.म्हणजे दररोज एक तरी माणूस रस्तयावर मृत्युमुखी पडतो.2015 मध्ये 1 हाजर 423 अपघात झाले होते आणि त्यात 375 जणांचा बळी जाऊन 855 जखमी झाले होते.मुंबई-गोवा महामार्गा हा मृत्यूचा महामार्गा झाला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर 460,मुंबई-पुणे महामार्गावर 14 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 131  अपघात झाले होते.ही मोठी समस्या असली आणि दररोज एकतरी माणूस मृत्युमुखी पडत असला तरी कोणताही राजकीय पक्ष या समस्यांवर बोलत नाही

पाणी

रायगड जिल्हयात दरवर्षी 3500 मिली मिटर पाऊस पडत असला तरी जिल्हयात जानेवारीपासूनच जवळपास 1200 गावांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे राहते.याचा अर्थ जे पाणी पडते ते वाहून जाते.जिल्हयात जवळपास छोटी30धरणंआहेत.त्यातराजनाला,हेटवणे,कालप्रकल्प,तीनविरा,रानबाजिरे,डोलवहाळ,मोर्बे,वरंध,खिरवली,कोथुर्डे आदि धरणांचा नामोल्लेख करता येत असला तरी ही धरणं जानेवारी-फेब्रुवारीतच कोरडी पडतात आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो.त्यामुळं दरवर्षी 7 ते 9 कोटी रूपये खर्च पाणी पुरवठयावर करावा लागतो.याकडंही विशेष कोणी लक्ष देताना दिसत नाही.

शेतकर्‍यांसमोरील संकंटं

रायगड हा कधी काळी भाताचं कोठार म्हणून प्रख्यात असलेला जिल्हा होता.मात्र वाढते औद्योगिकर आणि वाढते शहरीकरण यामुळं कृषीयोग्य शेती कमी होत चालली आहे.शिल्लक राहिलेल्या जमिनीही वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जबरदस्तीनं घेतल्या जात असल्यानं शेतकरी अस्वस्थ आहेत.नवी मुंबई विमानतळ,दिल्ली-मुंबई औद्योगिक कॅरिडोर,तसेच रस्ता रूंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित केल्या जात असल्यानं शेतकरी आणि शेती जिल्हयात राहील की नाही याची धास्ती शेतकर्‍यांना आहे.त्यांच्या पुनर्वसानाबद्दल कोणीच बोलत नाही.कोयना प्रकल्पग्रस्त असतील किंवा अन्य प्रकल्पातील असतील त्यांचे प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत.कृषी क्षेत्र कमी होत असल्यानं शेती परवडणारी राहिली नाही.मजूर आणि अन्य प्रश्‍नही आहेत.उत्पादनातली घट हे शेतकर्‍यांना डोकेदुखी ठरत आहे.

कुपोषण

रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या १५ तालुक्यांत महिला बालविकास विभागाचे १७ प्रकल्प आहेत. जिल्ह्यात २६०४ अंगणवाड्या असून ६०४ मिनी अंगणवाड्या आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या १५,७७७ बालकांना महिला बालविकास विभागातर्फे पोषण आहार दिला जातो. स्तनदा माता तसेच गरोदर महिला यांना देखील अंगणवाडी शाळेत विशेष आहार दिला जातो. तरीदेखील जिल्ह्यात ४५१ तीव्र कुपोषित आणि ९५८ अतिकुपोषित बालके असताना कमी वजनाची म्हणजे कुपोषणाच्या व्याख्येत महत्त्व असलेली ११५२ बालके आहेत. तीव्र, अति आणि कमी वजनाची अशी कुपोषित बालके यांची संख्या ही रायगड जिल्ह्यासाठी भूषणावह नक्कीच नाही

या शिवाय आरोगय,शिक्षणाचे प्रश्‍नही जिल्हयात आहेत.

या शिवाय आरोगय,शिक्षणाचे प्रश्‍नही जिल्हयात आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here