महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 54 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी तटकरे यांनी पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांच्या संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. तटकरे यांच्या हस्ते पोलीस दलातील उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्वश्री रविंद्र महादेव महापती-आर.पी.आय.,शामराव गनू तुरंबेकर- पी.एस.आय., विश्वनाथ बुधाजी पाटील-ए.एस.आय., अशोक हरीभाऊ म्हात्रे-1814पोलीस नाईक यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
सुनिल तटकरे यांच्या समवेत जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ,जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि मान्यवर उपस्थित होते.