अलिबागला साऊंड अ‍ॅन्ड म्युझिक शो ?

0
902
????????????????????????????????????
अलिबागला साऊंड अ‍ॅन्ड म्युझिक शो तयार करणार :जयकुमार रावल 
अलिबागः नव्या वर्षात अलिबाग येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळी लाईट अ‍ॅन्ड म्युझिकवर आधारित शो सुरू कऱण्याबरोबर अलिबाग किनार्‍यांवर पर्यटकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज अलिबाग येथे केली.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , अलिबाग नगर परिषद आणि महिला बचत गट फेडरेशनच्यावतीने आयोजित अलिबाग महोत्सव 2017 चे उद्दघाटन रावल यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.
कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय,त्यामुळं स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्त्रोत म्हणून पर्यटन सुविधांचा विकास करण्याची ग्वाही रावल यांनी यावेळी दिली.यावेळी आमदार जयंत पाटील,आमदार पंडित पाटील नगराध्यक्ष प्रशांत नाईक,जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सुर्यवंशी आदि उपस्थित होते.हा अलिबाग महोत्सव 26 डिसेंबरपर्यंत चालणार असून चार दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहेत.सलग सुटया आणि नाताळमुळे अलिबाग शहर पर्यटकांनी खचाखच भरले आहे.त्यामुळं रात्रीच्या कार्यक्रमांचा पर्यटकांनी मनमुराद आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here