अर्णव गोस्वामी यांनी राजीनामा का दिला?
अर्णव यांच्या नावाचा हॅशटॅक ट्विटर ट्रेंडमध्ये
‘टाईम्स नाऊ’चे संपादक अर्णव गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोस्वामी यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा ट्विटरकरांनी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी हे ‘टाईम्स नाऊ’चे लोकप्रिय संपादक आहेत. अर्णव यांचा ‘द न्यूज अवर’ हा चर्चासत्राची माध्यमविश्वात बरीच चर्चा असते. नुकतेच अर्णव यांना पाकिस्तान स्थित एका दहशतवादी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून अर्णव ‘द न्यूज अवर’ या कार्यक्रमात देखील दिसून आले नव्हते. अखेर मंगळवारी अर्णव यांनी टाईम्स नाऊच्या संपादक पदावरून राजीनामा दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अर्णव यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ट्विटकर मात्र अर्णव यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावरून ट्विटरवर अर्णव यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे. अर्णव यांच्या राजीनाम्यावर ट्विटरकर आपले मत व्यक्त करत असून अनेकांनी ‘India wants to know’ या टॅगलाईनसह अर्णव यांच्या राजीनाम्याचे कारण जाणून घेण्यासाठीचे प्रश्न विचारले आहेत. काही ट्विटरकरांनी तर अर्णव यांनी पाकच्या धमकीला घाबरून राजीनामा दिल्याचे म्हटले आहे, तर अर्णव यांच्या राजीनाम्याचे वृत्त धक्कादायक असल्याचेही काही ट्विटरकरांचे म्हणणे आहे.काहींनी अर्णबला राज्यसभेवर घेणार असे भाकित केले आहे,काहींनी अर्णब स्वतःचे वेगळे चॅनल सुरू करणार असल्याचे म्हटले आहे,काहींनी अर्णब सक्रीय राजकारणात जाणारचं भाकित केलं आहे तर काहींनी मॅनेजमेंटला अर्णबची वाढती लोकप्रियता पाहावत नसल्याचा शोध लावला आहे.