पुढं काय करणार…?

0
746

टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. अर्णब यांनी राजीनामा का दिला ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाइम्स नाऊ वाहिनीवरील ‘द न्यूजहवर’ या अर्णब यांच्या लोकप्रिय डिबेट शो मध्ये ते येणा-या पाहुण्यांना नेशन वाँट्स टू नो व्हाय? हा प्रश्न विचारतात.

 राजीनाम्यानंतर याच प्रश्नाचे उत्तर अनेकांना अर्णब यांच्याकडून हवे होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजीनामा देऊन आल्यानंतर अर्णब यांनी मंगळवारी संध्याकाळी ४.३० वाजता संपादकीय चमूची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण टाइम्स नाऊला बनवण्यासाठी कशी मेहनत घेतली त्याचे वर्णन केले. जवळपास ५० जण या बैठकीला उपस्थित होते.
आणखी वाचा 
आपण काय पुढे करणार हे अर्णब यांनी जाहीर केलेले नाही पण त्यांनी काही संकेत दिले. स्वतंत्र मिडिया हाऊस सुरु करण्याची अर्णब यांची संकल्पना असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. अर्णबला फक्त टेलिव्हिजन मिडियामध्ये अडकून पडण्यात सर नाही. मिडियामध्ये जे बदल होतायत त्याचे नेतृत्व करण्याची अर्णबची इच्छा आहे असे या पत्रकाराने सांगितले.
मला एका साच्यात अडकून पडायचे नाही. बदलत्या वेळेनुसार, काळानुसार पुढे जायचे आहे असे अर्णब यांनी या बैठकीत सांगितले. राजीनामा दिल्यानंतर अर्णब बोलत असताना न्यूज रुममध्ये पूर्णपणे शांतता होती. अर्णबचा राजीनामा टाइम्स नाऊमधील कर्मचा-यांसाठी धक्कादायक नाही कारण अर्णब चॅनल सोडणार असल्याची कुजबुज आधीपासूनच होती.
अर्णब यांनी राजीनामा दिला असला तरी, प्राईम टाइममध्ये अर्णब यांचा शेवटचा एपिसोड केव्हा प्रसिद्ध होणार याबद्दल अजून काहीही स्पष्टता नाही. अर्णब लवकरच स्वत:ची वृत्तवाहिनी सुरु करण्याची शक्यता आहे. राजीनाम्यासाठी अर्णब यांच्यावर मॅनेजमेंटकडून कोणताही दबाव नव्हता असे सूत्रांनी सांगितले.
लोकमतवरून साभार
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here