शिवशाहीतून पत्रकारांना मोफत प्रवास

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाहीतून प्रवास करण्यासंबंधीचा शासनादेश ( जीआर शासन निर्णय क्रमांक एसटीसी-1017 / प्र.क्र.525 / परि-1 दिनांक 9 ऑक्टोबर 2018 ) आज अखेर निघाला आहे.त्यामुळं आता अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाहीतून मोफत प्रवास करता येणार आहे.आसनी आणि शयनयान अशा दोन्ही पध्दतीच्या शिवशाहीतून प्रवास करता येणार आहे.मराठी पत्रकार परिषदेने यासंबंधी सातत्यानं महाराष्ट्र सरकारकडं पाठपुरावा केला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडं परिषदेने प्रवास सवलतीची मागणी लावून धरली होती.त्याला अखेर यश आलं असून आता वातानुकुलीत प्रवास करता येणार आहे.शासनाच्या या निर्णयाबद्दल मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे आभार मानले आहेत.महाराष्ट्र शासन विविध 27 समाज घटकांना एस.टी.ची सवलत देत असते.यामध्ये आजी-माजी आमदारांचाही समावेश आहे.आजी-माजी आमदारांना शिवनेरीसह सर्व प्रकारच्या एस.टी गाड्यांमधून मोफत प्रवासाची सवलत दिली गेलेली आहे.पत्रकारांना वर्षभरात आठ हजार किलो मिटरचा मोफत प्रवास अनुज्ञेय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here