#MeToo  चळवळीचे फटके माध्यमांना बसू लागले आहेत.त्यामुळं माध्यमातील दिग्गज चेहरे अडचणीत येत आहेत.भूतपूर्व पत्रकार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावरही लैगीक शोषनाचे आरोप झाले आहेत.एका दैनिकाचे संपादक असताना नोकरीसाठी आलेल्या एका महिला पत्रकाराचा कसा छळ केला याची माहिती प्रिया रमाणी यांनी दिल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे.रमाणी यांच्यानंतर अन्य महिला पत्रकारांनी देखील एम.जे अकबर यांच्यावर लैगिक छळाचा आरोप केला आहे.मात्र केंद्र सरकार अजून तरी याविषयावर सोयीनुसार मौन बाळगून आहे.सुषमा स्वराज असोत की,मेनका गांधी यांना या बाबत छेडले असता त्यानी कानावर हात ठेवणे पसंत केले.अकबर यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
असाच आरोप झालेले हिंदुस्थान टाइम्सचे ब्युरो चीफ प्रशांत झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तर टाइम्स ऑफ इंडियाच्या हैदराबाद आवृत्तीचे संपादक के.आर.श्रीनिवास यांना सक्तीच्या रजेवर जायला सांगितले गेले.त्यामुळं माध्यमात देखील खळबळ उडाली आहे.

एडिटर्स गिल्डनं महिला पत्रकारांच्या पुरूष सहकार्‍यांकडून झालेल्या लैगिक छळ प्रकरणी निवेदन प्रसिध्द केले आहे.या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी आणि या प्रकरणाता जे कोणी जबाबदार असतील अशांवर कारवाई व्हावी अशी मागणी एडिटर्स गील्ड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here