चेन्नईः एखादया उच्चपदस्थ व्यक्तीच्या विरोधात एखादी बातमी छापली किंवा लेख लिहिला तर तो देशद्रोह होऊ शकतो काय? नाही . पण हल्ली वातावरणच असंय की,काहीही होऊ शकते.विशेषतः पत्रकारांवर व्यवस्थेची वक्रदृष्ठी असल्यानं त्यांच्या मनात दहशत बसविण्यासाठी पत्रकारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारिलाल पुरोहित यांच्या विरोधात लेख लिहून त्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून तामिळनाडूतील ज्येष्ठ पत्रकार नक्कीरन गोपाल यांच्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आङे.पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यातही घेतलं आहे.राजभवनातून तक्रार केली गेल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.गंमत म्हणजे बनवारीलाल पुरोहित याचं महाराष्ट्रात स्वतःचं दैनिक आहे.ते स्वतःला पत्रकार म्हणवून घेतात.
नक्कीरन गोपोल याचं एक तामिळ नियतकालिक आहे.या नियतकालिकात त्यांनी निर्मलादेवी सेक्स स्कॅन्डल प्रकरणाशी संबंधित लेख प्रसिध्द केला होता.त्यानंतर राजभवनाने पोलिसात तक्रार केली.त्यानंतर चक्रे फिरली आणि गोपाल यांना अटक केली गेली.बनवारीलाल पुरोहित यांची बदनामी झाली असेल तर त्यानी अब्रुनुकसानीची दावा दाखल केला असता तर ते समजू शकते.मात्र गोपाल यांच्यावर थेट देशद्रोहाचाच खटला दाखल केला गेला आहे.राज्यपालांच्या विरोधात लेख लिहणे हा देशद्रोह आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय..
गोपाल यांना ताब्यात घेतल्यानंतर एमडीएमकेचे नेते वायके यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी वायकोंना भेट नाकारली.या घटनेचा निषेध करताना वायको यांनी सरकार माध्यमांचा आवाज दडपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.तामिळनाडुतील राजकीय पक्ष आणि पत्रकार संघटनांनी या अटकेचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here