Sunday, April 28, 2024
Home Blog Page 370

एका पत्रकाराचं ” जाणं..”.

0

[divider]
अलिबागमध्ये असतानाचा माझा एक जुना सहकारी बापू आफळे याचं निधन झाल्याची बातमी मन अस्वस्थ करून गेली.खरं तर बापूचं वय काही जाण्यासारखं नव्हतंच.आत्ताच तो साठीत होता.त्यामुळच त्याचं अवचित जाणं जिवाला चटका लावून गेलं.
बापूनं ऐक्य,ग्रमोध्दार,कृषीवलमध्ये पत्रकारिता केली.हाडाचा पत्रकार असलेल्या बापूला वार्ताहराकडून आलेली बातमी मोजक्या शब्दात कशी लिहायची यात हातखंडा होता.उत्तम अक्षर,आणि बातमीत एकही खाडाखोड नसलेली बापूची कॉपी असायची.चार-पाच महिने आम्ही अलिबागला आरसीएफ कॉळनीत राहायचो. या काळात बापूनं आणलेला डबा आम्ही अनेकदा शेअर केलेला आहे.बापू चांगला पत्रकार तर होताच पण त्याच बरोबर तो एक चांगला माणूसही होता.त्याच्या लिखाणातूनही माणुसकीचा हा गहिवर बघायला मिळायचा. अगदी तीन-चार महिन्यापूर्वी बापूची रत्नागिरीत भेट झाली होती.दाढी वगैरे वाढलेली. दाभाडं बसलेली आणि भेदरलेली नजर बापूंसमोर अनेक समस्या आहेत हे दाखवून द्यायची.नोकरीच्या शोधात असलेल्या बापूची मी तेथे उपस्थित असलेल्या एका मालक-संपादकांकडं शिफारसही केली होती.संपादकांनी लगेच ये असंही सांगितलं होतं पण नंतर कळलं की,कोकणात पुन्हा जाण्याचं बापूल ा जमलंच नाही.
काल त्याच्या निधनाची बातमी आल्यावर एक चांगला पत्रकार मित्र गेल्याचं दुःख अनावर झालं.आयुष्यभर पत्रकारिता केल्यानंतरही कफल्लक अवस्थेतच बापू गेला.राज्यात अनेक पत्रकारांची अवस्था बापू पेक्षा वेगळी नाही. दुदैर्वानं सरकार आणि समाजाला काही सुखवस्तू आणि उपद्वव्यापी पत्रकारच दिसतात.त्यांच्याकडं बोट दाखवतच साऱ्यांची तुलना होते.त्यामुळं बापूसारखे पत्रकार उपेक्षेचे धनी ठरतात.असो.
बापू महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा संचालक होता.निधीतून त्यांच्या कुटुबियांना काही मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.जिल्हा पत्रकार संघ तसेच साताऱ्यातील पत्रकारांनाही नम्र विनंती आहे की,बापूचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही यासाठी काही निधी जमा करता आला तर पहावा.सरकारच्या पत्रकार कल्याण निधीकडून काही अपेक्षा नाही.तिथंली बरीच सरकारी मंडळी मदत देण्याऐवजी मदत कशी देता येणार नाही यावरच काथ्याकूट करीत असतात.हा अनेकदा आलेला अनुभव आहे.बापूंचे दोष काढत बसण्याची ही वेळ नाही हे आपण साऱ्यांनीच लक्षात ठेवावं.नाही जमत एखादयाला व्यवहार .. नाही जमत एखादयाला चांगलं जगणं म्हणून साऱ्याचं खापर त्याच्याच माथी फोडण्यात अर्थ नाही.बापूलाही तसंा जमला नाही म्ङणून आता तेच उगळत बसणं योग्य नाही.

सोनिया गांधींच्या विरोधात पत्रकार शाजिया

0

मनिष शिसोदिया,आशुतोष आणि आता टीव्ही एँकर शाजिया इल्मी यांना आप तर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शाजिया खुद्द सोनिया गांधी यांच्या विरोधात रायबरेलीतून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी आप पार्टी प्रसिध्द चेहरा सोनिाया गांधी यांच्या विरोधात मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.इल्मी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत झाल्या होत्या.

आता 21 मार्च

0

[divider]

आमदारांच्या पेन्शन वाढीच्या विरोधात दाखल केलेल्या जनहितयाचिकेवरील सुनावणी आता 21 मार्च रोजी होत आहे.ऑगस्टमध्ये ही याचिका दाखल केली गेली होती.आतापर्यत सात-आठ वेळा तारीख पडली.निवडणुकांपुर्वी यासंबंधीचा काही निकाल लागेल असे वाटत नाही.

एबीपी न्यूज च्या पत्रकारावर हल्ला

0

राजकारणी,समाजातील अपप्र्रवृत्तींच्या विरोधात बातम्या देण्याची किंमत पत्रकारांना दररोज मोजावी लागत आहे.युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव याचं गाव असलेल्या इटावातही काल असंच घडलं.एबीपी न्यूज वाहिेनीचे पत्रकार मोहम्मद खालिक यांच्यावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला.
नमाज पढून खालिफ परतत असताना पक्का तलाब भागात त्यांच्यावर हल्ला झाला.त्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

रायगड जिल्हयात दोन दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले

0

रायगड जिल्हयात गेल्या दोन दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले झाले.पहिली घटना अलिबाग येथे घडली.अलिबाग येथील पुढारीचे फोटोग्राफर-पत्रकार रमेश कांबळे यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.अलिबाग येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या वार्तांकनाच्या संदर्भात महिला आघाडीचा काही आक्षेप होता.त्यासंदर्भात त्यांनी पुढारीच्या संपादकांची मुंबई येथे जाऊन भेटही घेतली होती.त्यानंतर पुढारीत खुलासाही छापला गेला होता.असे असतानाही कांबळे यांना पोलिस स्टेशनसमोरच मारहाण केली गेली.आज अलिबाग येथे झालेल्या प्रेस क्लबच्या बैठकीत या घटनेचा निषेध कऱण्यात आला.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमत्रक दीपक शिंदे यांनी आज अलिबाग येथे पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

दुसरी घटना खोपोलीत काही वेळा पुर्वी घडली.खोपोली येथील साप्ताहिक समाज वैभवचे संपादक गोकुळदास येशीकर यानी आपल्या साप्तहिकात शीळगाव येथे माजी उपनगराध्यक्षांसह त्यांच्या भावंडानाही चोपले,पेढेही वाटले अशा मथळ्याखाली बातमी छापली होती.त्यामुळे संतापलेल्या स्थानिक पुढारी इब्रहिम पाटील यांचे बंधू आयुब पाटील यांनी आज येशीकर यांना बेदम मारहाण केली.गंमत अशी की,माझ्या जिवाला धोका आहे अशी तक्रार येशीकर यांनी 14 तारखेला खोपोली पोलिसात दाखल केली होती.त्याची एनसी देखील दाखल झाली होती.मात्र पोलिसांनी कोमतीच कारवाी केली नसल्याने आज हा हल्ला झाला.रायगड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला असून आरोपीवर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.

कर्जतच्या नगराध्यक्षपदी राजेश लाड

0
रायगड जिल्हयातील कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश लाड यांचा दोन मतांनी विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे मुकेश पाटील यांचा पराभव केला. उप-नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लालधारी पाल यांची निवड झाली. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा तर शिवसेना भाजप महायुतीला  आठ जागा मिळाल्या होत्या.राजेश लाड यांची निवड होताच फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने यश संपादन केले होते.

पत्रकारांचा राज्यभर डीआय़ओ कार्यालयांना घेराव आंदोलन यशस्वी,समितीतर्फे पत्रकारांचे आभार

0
मुंबई दिनांक -17 ( प्रतिनिधी ) पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा आणि पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी या आणि अन्य 9 मागण्यांसाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनाी आज राज्यातील डीआय़ ओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन केले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली होती.राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 35 जिल्ह्यात आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
राज्यातील पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.राज्यात दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे.दुर्दैवाने सरकारला हे हल्ले थांबविण्यात  अपयशी ठरले आहे.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी राज्यातील पत्रकार गेली पाच वर्षे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली करीत आङेत.मात्र पत्रकार संरक्षण कायदा असो किंवा पत्रकार पेन्शन योजनेची मागणी असो सरकार सातत्यानं  पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षाच करीत आहे. याचा निषेध करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात आले.ते सर्वत्र यशस्वी झाले.
मुंबईत पत्रकारांनी माहिती महासंचालकांची भेट घेऊन सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे करीत असलेल्या दुर्लक्षांबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.पुण्यातही शंभरावर पत्रकारांनी एकत्र येत जिल्हा माहिती कार्यालयासमोर उग्र निदर्शऩे केली.राज्यात नगर,रायगड,नंदूरबार,नांंदेड,वाशिम,अकोला,बीड,लातूर,कोल्हापूर,औरंगाबाद,उस्मानाबाद,जळगाव,पऱभणी,हिंगोली,रत्नागिरी,
सांगली,सातारा आदि जिल्हयासह सर्वच जिल्हयात आंदोलन यशस्वी झाले आहे.
ठिकठिकाणी पत्रकारांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयसमोर जमा होऊन निदर्शऩे केली,डीआयओ कार्यालयांना घेराव घालून काही काळ काम बंद पाडले आंादोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे निवदने देण्यात आली.ठरल्या प्रमाणे सर्वत्र आंदोलन शातंतते पार पडली.
पुणे येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी बोलतान समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी सरकारने कायदा आणि पेन्शनबाबत तातडीने निर्णय़ घेतला नाही तर यापेक्षा अधिक उग्र आंदोलन कऱण्याचा इशारा दिला.पत्रकाराना संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी वारंवार रस्त्यावर यावे लागते ही बाब सरकारला शरम वाटावी अशी आहे.त्यामुळे आता सरकारने पत्रकारांचा जास्त अंत न बघता पत्रकाराचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी त्यांनी  केली. भक्कम एकजूट दाखवत राज्यातील पत्रकारांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल देशमुख यांनी विविध पत्रकार संघटना तसेच तमाम पत्रकारांना धन्यवाद दिले आहेत.

अलिबागच्या डीआयओ कार्यालायला पत्रकारांचा घेराव

0

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा आणि पत्रकारांसाठी पन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज रायगड जिल्हयातील पत्रकारांनी अलिबाग येथे जिल्हा माहिती कार्यालयासमोर उग्र स्वरूपाची निदर्शने केली.नतर जिल्हा माहिती अधिकारी सुहास नेवासकर यांना पत्रकारांच्यावतीने एक निवेदन देण्यात आले.या निवेदनात अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठन करावे,पत्रकारांसाठी विमा योजना लागू करावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी आदिंनी आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलनात शंभरावर पत्रकार सहभागी झाले होते.

राज्यातील पत्रकारांचे आज राज्यभर आंदोलन

0

पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि राज्यातील पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी या आणि अन्य नऊ मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधा कृती समितीच्यावतीनं राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे.उद्या सकाळी राज्याच्या 35 जिल्हयात हे आंदोलन होत आहे.सकाळी 11 वाजता प्रत्येक जिल्हयातील पत्रकार जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात जातील तेथे तीव्र स्वरूपाची निदर्शऩे केली जातील.आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याचे समितीच्या प्रसिद्दी पत्रकात नमुद कऱण्यात आले आहे.

मुंबईतही हे आंदोलन होत आहे.मुंबईतील पत्रकार दुपारी 4 वाजता मंत्रालयासमोरच्या प्रशासकीय इमारतीसमोर जमा होतील.तेथून ते माहिती महासंचालाकंच्या कार्यालयात जाऊन सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे करीत असलेले दुर्लक्ष आणि एकूणच पत्रकारांच्या प्रश्नांंंबाबतच्या सरकारच्या उदासिन भूमिकेबद्दल आपला प्रोटेस्ट नोंदवतील.मुंंबईतील पत्रकारांनी या प्रतिकात्मक आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे करण्यात आलं आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख पुण्यातील आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मुंबई विधीमंडळ वार्ताहरसंघाची सदस्यांसाठी विमा योजना

0

वार्ताहर संघाच्या सदस्यांकरता अक्सिडेन्टल मेडिक्लेम विमा योजना
कार्यकारीणीच्या शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०१४ च्या बैठकीतील महत्वाचा
निर्णय
सदस्यांच्या माहितीस्तव

* मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०१४
रोजी पार पडलेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत खालील महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
सदस्यांनी या योजनेत आवर्जून सहभाग घेतल्यास अपघातामुळे निर्माण होणाèया जीवन
मुल्याची सुमारे दोन लाख qकवा पाच लाख रुपयांची रक्कम पत्रकार अथवा त्यांच्या
वारसांना प्राप्त होऊ शकेल.
१)     वार्ताहर संघाच्या सर्व सदस्यांकरिता ‘अ‍ॅक्सिडेन्टल मेडिक्लेमङ्क विमा
लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय कार्यकारीणीने घेतला आहे. ओरिएन्टल इन्शुरन्स
कं. या राष्ट्रीयकृत विमा कंपनीचा देकार स्वीकारून ही विमा योजना लागू
करण्याचे कार्यकारीणीने निश्चित केले आहे. दोन लाख आणि पाच लाख रुपये
भरपाईच्या या विमा योजनेसाठी विमा कंपनीचा वर्षाचा एका व्यक्तीसाठीचा प्रिमियम
सरासरी ९७५/- आणि १५२०/- रुपये इतका आकारला जातो आहे. मात्र वार्ताहर संघाच्या
अध्यक्षांनी केलेल्या विनंतीनुसार या प्रिमियममध्ये अनुक्रमे ७२५ आणि ७७०
रुपयांची सूट देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. या देकारामुळे दोन लाख
रुपये इतक्या वार्षिक विमा योजनेत सहभाग घेणाèया वार्ताहर संघाच्या सदस्याला
वर्षाकाठी केवळ २५०/- आणि ५ लाख रुपयांच्या विम्यासाठी रु ७५०/- इतकाच
प्रिमियम भरावा लागणार आहे. या प्रिमियममध्ये सदस्यांना अथवा त्यांच्या
वारसांना खालील आर्थिक फायदे मिळू शकतात.

अ)    अपघाती निधन झाल्यास २ लाख रु. विमा योजनेत संघ सदस्यांच्या वारसास
१,००,०००/- (रुपये एक लक्ष मात्र) इतकी तर ५ लाख रुपये विमा योजनेतील संघ
सदस्याच्या वारसास ५,००,०००/- (रु. पाच लाख मात्र) रक्कम एकरकमी (संघाच्या
गॅरेन्टीने) प्राप्त होईल.
ब)    अपघात होऊन त्यामुळे सदस्याला पूर्णत: विकलांगता आल्यास अथवा दोन्ही
डोळे कायम निकामी झाल्यास विम्यातील नमूद १०० टक्के इतकी रक्कम (रु. २ लाखास
रु. १ लाख आणि रु ५ लाखास रु. ५ लाख) सदस्याला प्राप्त होईल.

क)     अपघातामुळे एका डोळ्याची दीर्घकालीन हानी झाल्यास सदस्याला विम्यातील
नमूदपैकी ५० टक्के इतकी रक्कम प्राप्त होईल.

ड)     अपघातामुळे शरीराचे कुठलेही अवयव कायम निकामी झाल्यास विम्याच्या १००
टक्के इतक्या रकमेचा परतावा सदस्याला मिळू शकेल.

इ)     अपघातामुळे सदस्याला इस्पितळात दाखल व्हावे लागल्यास उपचारासाठी
येणाèया खर्चातील आठवड्याचा कमाल एक टक्के इतका खर्च आठवड्याला (२ लाखास १
हजार आणि ५ लाखास ५ हजार रुपये) विमा कंपनीकडून इस्पितळाला वळता केला जाईल.

फ)     विमा योजनेत भाग घेणाèया पत्रकार सदस्याच्या वयाची मर्यादा ७० वर्ष
निर्धारीत करण्यात आली आहे.

ग)     सदस्यांच्या अपघात क्षेत्राची कुठलीही मर्यादा नाही. जगात कुठल्याही
अपघातासाठी ही योजना लागू राहील. पोलीस नोंद आणि पंचनामा हा क्रायटेरिया
यासाठी लागू राहील.

ह)    या योजनेत सहभाग घेण्यासाठी किमान २५ सदस्यांची नोंद आवश्यक आहे. इतक्या
संख्येने सदस्यांचा संयुक्त विमा उतरवला जाईल.

वार्ताहर संघाच्या सर्वच सदस्यांनी या सवलतीच्या विमा योजनेचा लाभ घेऊन आपले
आणि आपल्या परिवाराचे जीवन अधिकाधिक सुरक्षित करावे, अशी विनंती आहे.
सदस्यांनी आपली नावे आणि पैसे २८ मार्चपूर्वी कोषाध्यक्ष श्री. महेश पवार किवा
श्री. मसुरकर, श्री. भागडे यांच्याकडे द्यावीत. यानंतर कुठल्याही परिस्थितीत
योजनेत नावे घेतली जाणार नाहीत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

(प्रवीण पुरो)                (मंदार पारकर)
अध्यक्ष                       कार्यवाह

POPULAR POSTS

error: Content is protected !!