Thursday, March 28, 2024
Home Blog Page 371

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणूकीत दिसले एकजुटीचे दर्शन !!!!

0

 पत्रकारांची मात्रॄ संस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची व्दैवार्षिक निवडणूक 3 ते 16 फेब्रुवारी 2014 या दरम्यान  पार पडली.महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचे आकर्षण ठरलेली व सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीच्या निकालाने शेवट पर्यंत उत्कंठा तानून धरली.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक व पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे निमंत्रक एस एम देशमुख यांच्या आदेशावरुन या निवडणुकीसाठी निरक्षक म्हणून माझी निवड झाल्याने ही निवडणुक प्रक्रिया मला जवळुन पाहता आली.निवडणुक जाहिर होताच संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी निवडणुक कार्यालयात मतदार यादी पाहण्यास गर्दी केली.गर्दी पाहूनच निवडणुक खुप अटी-तटीची होणार असा अंदाज आला.अध्यक्ष पदासह फक्त17जागेसाठी तब्बल 100 फॉर्म विक्री होऊन पत्रकारानांच्या निवडणुकीतला महाराष्ट्रात एक इतिहास घडला.त्यानंतर त्याच पटीत फॉर्मही जमा झाले.अर्ज छाननी,फॉर्म माघार प्रक्रियेनंतर निवडणुक अटळ आहे असे दिसत होते मात्र नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार केवळ पत्रकारांच्या एकजुटीसाठी एकत्र आले आणि ही अवघड वाटणारी निवडणुक बिनविरोध झाली.याकामी परिषदेचे किरण नाईक,एस एम देशमुख यांचे मार्गदर्शन व नांदेड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष केशव घोंणसे पाटील व मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी यांचे प्रयत्न कामी आले.या निवडणुकीच्या निमित्ताने पत्रकार एकीची बातमी क्षणात हिंगोली,परभणी, लातूर,बीड इत्यादी जिल्ह्यात पसरली व आपल्या जिल्ह्यातील निवडणुकाही नांदेड जिल्ह्याच्या निवडणुकीप्रमानेच करू या असा निर्धार पत्रकार मंडळीनी केला असल्याची चर्चा आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई यांनी माझ्यावर सोपलेली जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकलो याचा मला आंनद मात्र वेगळाच आहे.
बापूसाहेब गोरे(कार्याध्यक्ष- पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ तथा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड जिल्हा म.पत्रकार संघ 2014)

पत्रकार आशुतोष कपिल सिब्बल यांच्या विरोधात लढणार

0

पत्रकारितेतून राजकारण आलेले आशुतोष आता दिल्लीतील चांदणी चौक लोकसभा मतदार संघातून केंर्दीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या विरोधात उभे राहतील.मनिष सिशोदिया यांच्यानंतर आता आशुतोषही लोकप्रतिनिधी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आम आदमी पार्टीने आज आपल्या उमेदवारंीची यादी जाहीर केली.त्यात कुमार विश्वास अमेठीमधून राहूल गांधींच्या विरोधात तर नागपूरमधून अंजली दमानिया नितीन गडकरी याच्या विरोधात उभ्या राहात आहेत.मेधा पाटकर यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.त्याही आम आदमी पार्टीच्या तिकिटावर उत्तर-पूर्व मुंबईतून उभ्या राहणार आहेत.

आता युपीमध्येही पत्रकारांसाठी मेडिक्लेम आणि अपघात विमा

0

बिहार,राजस्थान,झारखंड ,मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यांच्या धर्तीवर आता उत्तरप्रदेशमधील अखिलेश यादव सरकारही राज्यातील पत्रकारांसाठी बारा लाखांचा विमा योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे.मेडिक्लेम आणि व्यक्तिगत अपघात विमा अशा दोन्ही प्रकारचे संरक्षण या विमा योजनेतून दिले जाणार आङे.
पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच अखिलेश यादव यांची भेट घेऊन पत्रकारांसाठी विमा योजना सुरू कऱण्याची मागणी केली.ती सरकारने लगेच मान्य केली आहे.राज्यातील पत्रकारांसाठी शासकीय रूग्णालयातही आता मोफत उपचार क ेले जाणार आहेत.त्या संबंधिची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.महाराष्ट सरकार असा निर्णय कधी घेणार असा प्रश्न विचारत असून उद्या होणाऱ्या आंदोलनातही त्यासंबंधीची मागणी केली आहे.

अपघातात चार पत्रकार जखमी

0

बातमीसाठी श्रीनगरहून बारामुल्लाकडे जाणाऱ्या पत्रकाराच्या गाडीला झालेल्या अपघातात चार पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत.एका तवेरा गाडीतून जाणाऱ्या पत्रकारांच्य गाडीत समोरून येणाऱ्या गाडीने जोराची टक्कर दिल्यानंतर हा अपघात झाला.स्थानिक रहिवाश्यांनी सर्व पत्रकारांना गाडीतून बाहेर काढत नजिकच्या एका खाजगी रूग्णालायत दाखल केले आहे.चारही पत्रकारांचा आता धोका टळला आहे.

बदलंतं पुणं

0

हे आहे एका पुलाचे ़छायाचित्र.हे छायाचित्र दुबई किंवा अन्य पाश्चात्य देशातील नाही.ते आहे आपल्या पुण्यातील.नाशिक फाट्यावर डबल डेकर पुल बांधण्यात आला आहे.त्याचे हे आल्हाददायक दृश्य आहे.या पुलामुळ नाशिक फाट्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.नाशिकला जाणाऱ्यांना आता पुलावरून विनाव्यत्यय नाशिककडे जाता येणार आहे.

पुरस्कार प्राप्त खेळाडूंप्रमाणेच पुरस्कारप्रापत्‌ शेतकऱ्यांनाही विश्रामगृहात आरश्रण हवे

0

अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार,ध्यानचंद पुरस्कार,शिवछत्रपती पुरस्कार,हिंद केसरी,रूस्तम-ए-हिंद,भारत केसरी,महान भारत कसेरी हे पुरस्कार प्राप्त खेळाडूंन आता शासकीय विश्रामगृहात शासकीय दराने आरक्षण मिळणार आहे.सरकारने चांगला निर्णय घेतला आहे.
15 जानेवारी 2011 रोजी सरकारने काढलेल्या अद्यादेशानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,व अपंग गुणवंत कामगार पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत त्यंानाही शासकीय विश्रामगृहात आरक्षण मिळाले आहे.
राहिले फक्त शेतकरी. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार कृषी भूषण,कृषी रत्न,कृषी मित्र यासारखे विविध पुरस्कार दर वर्षी देते.मात्र कृषी पुरस्कार ज्या शेतकऱ्यांना सरकार देते त्यांना कसलीच सवलत नाही.त्यांना बसमध्ये मोफत प्रवास मिळावा अशी मागणी होती ती देखील मान्य केली जात नाही.शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात राहाता कामा नये असा काही नियम नाही.त्यामुळे खेळाडू किंवा दलित मित्र पुरस्कार मिळालेल्या पुरस्कार्थींना ज्या प्रमाणे शासकीय विश्रामगृहात आरक्षणाची सोय केली गेली आहे त्याच प्रकारे शेतकऱ्यांसाठीही ही व्यवस्था झाली पाहिजे अशी पुरस्कार प्रापत्‌ शेतकऱ्यांची मागणी आहे.देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय घेण्यास राज्य सरकारला सांगावे अशी अपेक्षा आहे.

चोर समजून पत्रकाराची पिटाई

0

मणिपूरची राजधानी इंफालमध्ये एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराला एका जवानाने चोर समजून बेदम मारहाण केली.फ्री प्रेसचे पत्रकार एरिबम धनंजय उर्फ चाओबा काम संपवून घरी जात असताना रात्री 11.30 वाजता घरी परतत असताना इंडियन रिजर्व बटालियनच्या जवानांनी त्यांना बेदम मारहाण केली.मी पत्रकार आहे असे वारंवार सांगूनही जवानाने त्याचे काही ऐकले नाही.त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पत्रकार चाओबाने पोलिसात तक्रार दिली आहे.

दिल्लीत अखेर राष्ट्रपती राजवट

0

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंर्दीय मंि6मंडळाने काल रात्री घेतला.राष्ट्रपतीभवनातून अधिकृत सूचना निघाली की दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होईल.तात्काळ निवडणुका घेण्याच्या अरविद केजरीवाल यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत नायब राज्यपाल नजीब जंग यांनी विधानसभा निलंबित ठेवण्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे..विधानसभा प्रळंबित ठेवल्याने निवडणुका न घेता सभागृहात आहे त्याच ंसंख्याबळावर पर्यायी सराकार स्थापनेची शक्यता आजमाऊन पाहता येऊ शकणार आहे.

अभी तो शीला हारी है, अब मोदी की बारी है

0

दिल्लीतील सत्ता सोडल्यानंतर मोकळे झालेले अरविंद केजरीवाल आता देशभरात भ्रष्टाचार विरोधी रान पेटविणार आहेत.23 फेब्रुवारी रोजी हरियाणातून आणि 2 मार्च रोजी युपीतून केजरीवाल मोहिमेची सुरूवात करणार आहेत.योगेद्र यादव यांनी आज ही घोषणा केली.
अभी तो शीला हारी है,अब मोदी की बारी है. अशा घोषणा देणाऱ्या आपने आता आपले लक्ष्य नरेंद्र मोदी केले असल्याचे संकेत मिळत आहेत.अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

राकेश मारिया मुंबईचे पोलिस आयुक्त

0

एक आनंदाची बातमी आहे.गेल्या दहा-बारा दिवसांपासून बेवारस असलेल्या मुंबईला अखेर पोलिस प्रमुख मिळाला आहे.एटीएसचे प्रमुख राकेश मारिया हे आता मुंबईचे पोलिस आयुक्त असणार आहेत.सत्यपालसिंह यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती.या पदासाठी विजय कांबळे आणि अहमद जावेद त्यांचे प्रतिस्पर्धी होते.1981च्या बॅचचे मारिया यांनी 2003मध्ये झवेरीबाजार आणि गेवटवेवर झालेल्या स्फोटाच्या शोधात मोलाची भूमिका पार पाडली होती.

POPULAR POSTS

error: Content is protected !!