Friday, May 10, 2024
Home Blog Page 369

पनवेलमध्ये 24 बारबालांना अठक

0

पनवेल परिसरातील कोन विभागात काल रात्री पोलिसांनी एका ऑर्केेस्ट्रा बार वर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 24 बार बारांना अटक केली.अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते.
पकडण्यात आलेल्या बार बालांवर ग्राहकांशी अश्लील हावभाव केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्यांच्यावर प्रत्येकी बाराशे रूपायंची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरिक्षख प्रफुल्ल भिंगाडे यांनी दिली

फ्लेमिंगोची शिकार प्रकरणी अज्ञतांविरोधात गुन्हा दाखल

0
रायगड जिल्हयातील उरणच्या खाडी किनारी येणाऱ्या फ्लेमिंगो,पेंटेड स्ट्रोक,सारस या पाहुण्या पक्षाची होणारी शिकार थांबविण्यासाठी आता वनविभागाने विशेष मोहिम हाती घेतली असून काल सकाळीच वनपरिक्षेत्र अधिकारी मराडे यांनी उरण भाागातील खाडी किनाऱ्यांची पाहणी केली.या पाहणीत विविध पक्ष्यांची शिकार करून इतस्ततः फेकलेले अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून आले.हे सारे अवशेष वनविभागाने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.हे प्रकऱण गांभीर्याने घेत वनविभागाने अज्ञातांविरोधात दुर्मिळ पक्ष्यांची कत्तल केल्या प्रकऱणी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.हा गुन्हा सिध्द झाला तर भारतीय वन्य जीव संरक्षण कायदा 1972 नुसार आरोपीला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.

रायगडात शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावर जाऊन अनेक शिवभक्तांनी शिवरायांना अभिवादन केले.शिवयारांच्या पुतळ्याची विधिवत पुजा केली गेली.त्यावेळी जय भवानी.जय शिवाजीच्या गजरांनी परिसर दणाणून गेला होता.सायंकाळी उशिरापर्यत शिवभक्त गडावर येत होते.

अलिबागमध्येही नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.पनवेल आणि जिल्हयात अन्यत्रही शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आय़ोजन केले गेले होते.

आमदारांना 40 हजार, कलावंतंाना 1400 रूपये मानधन , पत्रकारांना बाबजीका ठिल्लु

0

[divider] लोकशाहीत लोकप्रतिनिधी जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच साहित्यिक,पत्रकारही महत्वाचे आहेत.कदाचित हे सरकारला मान्य नसावे किंवा माहित असूनही सत्तेची गणितं जुळविण्यासाठी लोकप्रतिनिधींवर सवलतींची खैरात केली जात असावी.माजी आमदाराना दरमहा 40 हजार रूपये पेन्शन देऊन सरकारनं हे दाखवून दिलं आहे.
आमदारांना 40 हजार रूपये निवृत्ती वेतन देणारे सरकार समाजाच्या जडणघडणीत ज्या साहित्यिक,कलावंत,पत्रकारांचा वाटा असतो त्याकडं मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे.साहित्यिकांना आणि कलावंतांना 1954 पासूनच मानधन देण्यास सुरूवात झाली.मात्र दिल्या जाणाऱ्या मानधनात महागाईच्या तुलनेत फारशी वाढच झाली नाही.या योजनेची नियमावली सास्कृतिक विभागानं नव्यानं तयार केली आहे.नियमावलीच बललली असली तरी मानधन मात्र वाढलेले नाही.सध्या कलावंत आणि साहित्यिकांनी किती मानधन मिळते माहित आहे अ वर्ग कलावंतांना 1 हजार 400,ब वर्ग कलावंतांना 1 हजार200,आणि क वर्ग कलावंतांना 1 हजार रूपये प्रतिमाह.आता सांगा एवढ्या रक्कमेत साहित्यिक,कलावंतांच्या डायबेटीसच्या औषधांचा तरी खर्च भागत असेल का . बरं हे मानधन तरी नियमित मिळते का तर तेही नाही.सहा-सहा महिने मानधन मिळतच नाही.कलावंत,साहित्यिकावर हा अन्याय आहे.त्यांचे मानधन वाढविले गेले पाहिजे.
पत्रकारांना तर एवढेही मानधन मिळत नाही.अनेक ज्येष्ठ पत्रकारांची अवस्था अत्यंत हलाखीची आहे त्यांना मदतीची गरज असताना सरकार डोळेझाक करीत आहे.हे सारं संतापजनक आहे.

कुरुळमध्ये शेकापला हादरा

0

जनार्दन’ का जादू चल गया!

उपसरपंचपदी अनिल पाटील

अलिबाग –  कुरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शेकापला जोरदार हादरा देत आपला उपसरपंच बसवला. शेकापचे दोन उमेदवार फोडण्याची जादू ऍड.जनार्दन पाटील यांनी शुक्रवारी केली. त्यामुळे शेकापच्या उर्वरित पाच उमेदवारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली.
राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस ऍड. जर्नादन पाटील यांना धोबीपछाड देण्यासाठी शेकापने कुरुळ ग्रामपंचायत अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी या ग्रामपंचायतीकडे लक्ष दिले होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप ७ तर राष्ट्रवादीचे ६ उमेदवार निवडून आले होते.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले ऍड. जनार्दन पाटील कुरुळचे रहिवासी आहेत. त्यांना त्यांच्याच गावात तोंडघशी पाडण्याची शेकापची योजना होती. मात्र जनार्दन पाटील यांनी ही कसलेल्या जादुगाराप्रमाणे करामत दाखवत शेकापलाच तोंडावर आपटले. अनिल वसंत पाटील आणि सुनिता नारायण पाटील या शेकापच्या दोन उमेदवारांना फोडून कुरुळ ग्रामपंचायतीवर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवला.
कुरुळ ग्रामपंचायत सरपंच एसटीसाठी राखीव आहे. मात्र या प्रवर्गातील उमेदवारच नसल्यामुळे सरपंचपद रिक्त आहे. तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे अनिल पाटील निवडून आले.

कुरुळच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अनिल पाटील आणि सुनिता पाटील या दोन उमेदवारांनी गावच्या भवितव्याच विचार करुन जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही खुप आभारी आहोत. कुरुळसाठी बरेच काही करायचे होते; मात्र सत्ता नसल्यामुळे ते शक्य होत नव्हते. आता मात्र गावचा विकास कोणी राखु शकणार नाही.
– ऍड. जनार्दन पाटील,
जिल्हा चिटणीस- राष्ट्रवादी

चंद्रपूर समाचार कार्यालयाला आग

0

मराठी दैनिक चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयाच्या गोदामाला रविवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पेपर रोल, कुलर, फर्निचर व इतर सामुग्री जळून खाक झाली. यात सुमारे पाच ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयात पेपर रोल ठेवण्यासाठी गोदाम आहे. रविवारी सकाळी विद्युत शॉर्ट सक्रीटमुळे अचानक आग लागली. यात संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. आग लागली तेव्हा शेजारच्यांना गोदामातून धूर निघतांना दिसला. त्यांनी याची माहिती चंद्रपूर समाचारचे संस्थापक संपादक रामदास रायपुरे, चंद्रगुप्त रायपुरे यांना दिली. माहिती मिळताच रायपुरे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच काही मिनिटांत अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.

कोकण किनारपट्टीवर सिगलची शिकार वाढली

0

विकास प्रकल्पांच्या नावाखाली किनारपट्टीवरील महाकाय वृक्षांची होणारी कत्तल,तिवरांची तोड आणि वाढते प्रदूषण यामुळे कोकणातील विविध दुर्मिळ पक्षाी अगोदरच इतिहास जमा होत असताना आता कोकणात येणाऱ्या सिगल पक्षांची संख्याही उत्तरोत्तर घटत चालली आहे.
दरवर्षी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात सिगल पक्षी येतात.कोकणातलं आल्हाददायक वातावरण, आणि खाद्याच्या मुबलकतेमुळे प्रजननासाठी हे पक्षी जानेवारी ते एप्रिल या काळात कोकणात येतात.पण यंदा सिगलच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.त्यातच छुप्या पध्दतीनं सिगलची शिकार होऊ लागल्याने पक्षी मित्र चिंता व्यक्त करीत आहेत.काही वर्षांपूर्वी उरणच्या किनाऱ्यावर दोघा शिकाऱ्यांना बंदुकीनं सिगलची शिकार करताना रंगेहात पकडण्यात आलं होतं.असे प्रकार आता सर्राश होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.या पार्श्वभूमीवर सिगलला शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळावं अशी मागणी पक्षी मित्र करीत आहेत.

बारावीच्या परिक्षेला यंदा रायगडातून 31 हजार विद्यार्थी

0

 20 फेब्रुवारी ते 29 मार्च या काळात होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परिक्षेसाठी रायगडातून 31 हजार 404 विद्यार्थी बसणार आहेत. यात वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्ङणजे 10592 विद्यार्थी आहेत.जिल्हयातील 28 परीक्षा केंद्रांवर या विद्यार्थ्यांची परिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.परिक्षेत कॉप्या किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत म्हणून 7 भरारी पथकांची नियवक्ती कऱण्यात आली आहे.बारावीच्या परिक्षांवर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निय़ंत्रण असणार आहे.प्राध्यापकांनी संप मागे घेतल्यानं परिक्षा सुरळीत होतील असा अंदाज आहे.

पत्रकार अशोक जैन यांचे निधन

0

ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी कार्यकारी संपादक अशोक जैन यांचे प्रदीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले.  ७० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.’महाराष्ट्र टाइम्स’चे जवळजवळ एक तप दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली होती. राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचे पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, इंदिरा गांधींची हत्या व त्यानंतर राजीव गांधींच्या कारकिर्दीचे एक पत्रकार म्हणून ते साक्षीदार होते. एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी ‘राजधानीतून’ या पुस्तकातून रोमहर्षक शब्दचित्रे रेखाटली होती.अशोक जैन यांना अनेक पुरस्कार मिळाले असून आजवर त्यांची एकूण २० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किऱण नाईक यांनी अशोक जैन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

0

PHVKSM  promotes press freedom worldwide and defends the rights of journalists to report the news without fear of reprisal. We take action wherever journalists are attacked, imprisoned, killed, kidnapped, threatened, censored, or harassed.

POPULAR POSTS

error: Content is protected !!