Monday, May 20, 2024
Home Blog Page 368

पत्रकार रस्त्यावर

0

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाला चिरडून टाकण्याची तालिबानी भाषा वापरली आहे.त्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने कालच तीव्र शब्दात निषेध केला आहे.त्यांनी आज आपल्या वक्तव्याब्दल सावरासारव केली असली तरी त्याच्या वक्तव्याच्या क्लीप वाहिन्यांवरून दाखविल्या जात असल्याने सुशीलकुमार शिंदे खोटे बोलत आहेत हे समोर येत आहे.त्यांच्या वक्तव्याच्या प्रतिक्रिया आता महाराष्ट्रात सर्वत्र उमटायला सुरूवात झाली आहे.ठिकठिकाणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने निदर्शने केली जात आहेत.सुशीलकुमार यांनी माध्यमांची माफी मागावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.

नगरमध्ये निदर्शने 

 गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी इले. मिडियाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नगरमध्ये निषेध करण्यात आला. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कृती समितीचे जिल्हा निमंत्रख मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील पत्रकार, इले. मडिया तसेच फोटोग्राफर संघटनेचे प्रतिनिधीही यामध्ये सहभागी झाले होते.

 सातारा येथे पत्रकार रस्त्यावर 

केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथे झालेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक मिडियाबाबत केलेल्या वक्तव्यांचा सातारा येथील इलेक्ट्रॉनिक मिडिया असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन ईमासच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांना देण्यात आले. सोलापूर येथील युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यात सुशिलकुमार शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाला ठेचून काढण्याची भाषा केली होती. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. सातारा येथील कॉंग्रेस भवनासमोर इमासच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. इमासने शिंदे यांचा निषेध करुन याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यावेळी ईमासचे अध्यक्ष सुजित आंबेकर, तुषार भद्रे, उपाध्यक्ष ओंकार कदम, शरद काटकर, राहुल पवार, सचिन जाधव, प्रतिक भद्रे, तुषार तपासे, राम पवार, सनी शिंदे, महेश पवार, तुषार जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

आंदोलनाचा दणका आणि पत्रकारांच्या एकजुटीचा विजय

0

98 वृत्तपत्रे सरकारी यादीवर,
काहींचे जाहिरात दरही वाढले

महाराष्ट्रातील पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाळी 17 तारखेला जे आंदोलन केले त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत.डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याच्या आंदोलनाच्या वेळेस सरकारने छोटी वृत्तपत्रे तसेच राज्यातील साप्ताहिकं जगली पाहिजे अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी समितीने केली होती.ही समितीची मागणी मान्य झाली आहे.हा पत्रकारांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया समितीचे निमत्रक एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी व्यक्त केली आङे.

सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातली 98 वृत्तपत्रांचा शासन मान्य यादीत समावेश करण्यात आला आहे.म्हणजे 98 सात्पाहिके आणि दैनिकाना सरकारच्या नव्याने जाहिराती मिळणार आहे.तसेच 53 वृत्तपत्रांच्या जाहिरात दरातही वाढ करण्यात आली आङे.
जाहिरात धोरण विषयक समितीचा अहवाल अजून आलेला नाही.तो आल्यानंतर जाहिरात दरात वाढ होईल.ही वाढ शंभर टक्के असावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.

काँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे

1

24 फेब्रुवारी : या ना त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी अडचणीत सापडणारे केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे उपनेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता पुन्हा एकदा एक वाद ओढावून घेतला आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे मीडियावर घसरले आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियामधील काही लोक बसल्या बसल्या थुकपट्टी लावण्याचं काम करत आहे. मध्यंतरीच्या काळाच मीडियातील काही मंडळींनी काँग्रेसविरोधात अप्रचाराची मोहिम उघडली होती अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं जाईल, अशी धमकीच शिंदे यांनी दिली.

शिंदे एवढ्यावर थांबले नाही पुढे ते म्हणाले, मीडियांनी समाजासाठी चांगली कामं करावी त्याबद्दल तुम्हाला कुणी रोखलं नाही. अशा कामाचं कौतुक केलं जाईल. पण मतांच्या करता एखाद्याला बदनाम करण्याचं काम, एखादी घटना चुकीचं सांगणं आणि समाजामध्ये वातावरण बिघडवणे हे देशाची जनता कधीच खपवून घेणार नाही असंही शिंदे म्हणाले. यावेळी शिंदेंनी मीडियावरच जातीय दंगली भडकावण्याचा गंभीर आरोपही केला. ते सोलापूरमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.शिंदे यांच्या वक्तव्याचा पत्रकार हल्ला कृती समितीने निषेध केलाय. सुशीलकुमार शिंदे यांनी मीडियाची माफी मागावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केलीय. विशेष म्हणजे शिंदे मीडियाबद्दलच नाही तर या अगोदरही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले होते. बोफोर्स घोटाळा जसे लोक विसरले तसा कोळसा घोटाळाही विसरतील असं विधानही शिंदे यांनीच केलं होतं. हेच नाही तर अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना वेडा मुख्यमंत्री अशी टीकाही शिंदे यांनीच केली होती.

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांची नावे जाहीर

0

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी विभागीय सचिवांच्या काल नाशिक येथे घोषणा केल्या आहेत.विभागीय सचिवांनी आपल्या विभागात संस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त पत्रकारांना परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.अमरावती विभागातील सचिवाचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच उपाध्यक्षांच्या नावांची घोषणाही लवकरच करण्यात येणार असल्याचे किरण नाईक यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी परिषदेचे कार्याघ्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर आदि उपस्थित होते,विभागवार चिटणीस खालील प्रमाणे

1) मुंबई विभाग — विकास महाडिक – नवी मुंबई

2) पुणे विभाग  — डी.के.वळसे पाटील -पुणे

3) कोकण विभाग-  मिलिंद अष्टीवकर -रोहा

4)कोल्हापूर        –  चद्रकांत पाटील- कोल्हापूर 

5) आौरंगाबाद विभाग- सुनील वाघमारे- औरंगाबाद 

6) लातूर विभाग       – केशव-धोणसे पाटील- नांदेड 

7) नागपूर विभाग      – संजय देशमुख- नागपूर 

8)नाशिक विभाग    –    अशोक भाटिया- जळगाव 

परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा 23 मार्चला नगर येथे मेळावा

0

मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासातील पहिलाच उपक्रम

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या तालुका अध्यक्षांचा एक मेळावा नगर येथे 23 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.परिषदेच्या 75 वर्षांचा इतिहासात तालुका अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ असल्याने निवडणुकांच्या धामधुमीत देखील राज्यातील 250च्या वर तालुका अध्यक्ष या मेळाव्यास उपस्थित राहतील असा विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक आणि माजी अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख यांनी काल नाशिक येथील जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पत्रकार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं रविवारी जिल्हयातील पत्रकारांचा मेळावा आय़ोजित करण्यात आला होता.यावेळी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक,कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज ,परिषदेचे संपर्क प्रमुख श्रीराम कुमेठेकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा,विजय बाबर,पत्रकार संघाचे ्‌अध्यक्ष य़शवंत पवार,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे,उपाध्यक्ष सुनील वाळूंज,कळवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवरे तसेच जिल्हयातील चारशेवर पत्रकार उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे काम प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे आणि राज्यातील सर्वच्या सर्व तालुके म्हणजे 358 तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत. मात्र आतापर्यत तालुका पत्रकार संघाचा थेट संपर्क परिषदेशी येत नव्हता.यापुढे प्रत्येक तालुके थेट परिषदेशी जोडण्याची परिषदेची योजना आहे.तालुका स्थरावरील पत्रकारांना अनेक प्रश्नांशी झगडावे लागते.तालुका स्तरावरच पत्रकारांवर जास्तीत जास्त हल्ले होत असतात.शिवाय ते संघटीत नसल्याने तसेच ते ज्या दैनिकाचे काम करतात ती दैनिकंही अनेक प्रकरणात संबंधीत वार्ताहरांच्या पाठिशी उभी राहत नसल्याने हे पत्रकार एकाकी पडतात.अनेकदा ते नैराश्येच्या गर्देत जातात आणि त्यातून अनेक जण पत्रकारितेतूनही बाद होतात.अशा पत्रकारांच्या पाठिशी परिषदेने खंबीरपणे उभे राहण्याची आश्वासक भूमिका घेतली.त्यामुळे या मेळाव्यास जास्तीत जास्त तालुका अध्यक्षांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.
अधिक माहितीसाठी पत्रकारांनी एस.एम.देशमुख 9423377700 किंवा किरण नाईक 9820784547 या क ्रमंाकावर सपर्क साधावा असे आवाहनही परिषदचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेर .सरचिटणीस संतोष पवार,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी केले आहे.

व्हिसल ब्लोअर्स विधेयकात, पत्रकारांनाही कायदेशीर संरक्षण ?

0

सकाळने आज एक चांगली बातमी दिली आहे.काल व्हिसल ब्लोअर्स विधेयक संसदेत मंजूर झाले आहे.त्यातील तरतुदींची माहिती अद्याप हाती आलेली नसली तरी आज सकाळने दिलेल्या बातमीन्वये या विधेयकात पत्रकारांनाही सरक्षण देण्यात आले आहे.सकाळच्या बातमीत म्हटले आहे, तक्रारकर्त्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना तीन वर्षे कारावास आणि पन्नास हजार रूपये शिक्षेची तरतूद विधेयकात आहे.पत्रकारांना केंद्राच्या कायद्यान्वये संरक्षण मिळणार आहे.या कायद्यातील तरतुदींचा आता जास्तीत जास्त प्रचार व्हायला हवा.भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा कायदा होत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही कें र्दीय कायदा मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा केला होता.आता महाराष्ट्रात सरकारने पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी आपली मागणी कायम आहे.

दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

0

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे.रविवारी नाशिक जिल्हयातील पत्रकारांची एकदिवसीय कार्यशाळा आहे.तेथे बोलायचे आहे.तसेच या कार्यशाळेतच मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किऱण नाईक,कार्याध्यत्र चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार,आणि काषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांचा माझ्या हस्ते सत्कार होत आहे.पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा-जिल्हयात अशा कार्यशाळा घेण्याचे परिषदेचे नियोजन आहे.नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांच्या पुढाकारने ही कार्यशाळा संपन्न होत आहे.

 

महिला पत्रकारांबरोबर मुंबईत असभ्यवर्तन

0

घटना आहे सोमवारची.मुंबईच्या परल भागातील हॉटेल अदितीमध्ये मुंबईतील इंग्रजी दैनिक मिड-डे च्या चार महिला आणि एक पुरूष पत्रकार लंचसाठी गेले होते.पत्रकारांना जागा करण्यासाठी बाजुचा टेबल किंचित सरकवा अशी विनंती वेटरने शेजाऱच्या टेबलवर बसलेल्या पाच -सहा लोाकांना केली.त्यामुळे ते चिडले.त्यांनी वेटरला आणि महिला पत्रकारांना शिविगाळ सुरूकेली.तमाशा नको म्हणून सर्व पत्रकार गप्प होते.त्यानंतरही एक व्यक्ती उठली आणि त्यांनी पत्रकारांच्या टेबलवर जाऊन तुम्हाला या शहरात जगणे दुश्वर करून टाकील अशी धमकी दिली.यानंतर पुरूष पत्रकाराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर पोरींबरोबर आहेस म्हणून जास्त हिरो गिरी करू नकोस असे म्हणात त्यालाही धमकी दिली गेली.हॉटेलात नेटवर्क नसल्याने  पत्रकारांना पोलिसांना बोलावता आले नाही पण नंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.त्यानंतर आरोपींनी सरेंडर केले.पण जेव्हा आरोपींना जमानतीवर सोडण्यात आले तेव्हा पोलिस इन्स्पेक्टर त्याना दरवाजापर्यत सोडायला आला.शेकहॅन्डही केला.ही बाब राकेश मारिया यांच्या कानावर घातल्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई कऱण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

सरकार पोलिस पाटलांचा विमा काढणार, पत्रकारांनी काय घोडे मारले ?

0

पत्रकारांवर होणारे हल्ले ,कामावर असताना होणारे अपघात,कामाच्या तणावामुळे उद्वभवणाऱ्या अनेकविध व्याधींपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने पत्रकारांसाठी अपघात आणि मेडिक्लेम विमा योजना राबवावी अशी मागणी पत्रकार गेली दहा-पंधरा वर्षे करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने आता पोलिस पाटलांचा विमा काढण्याची घोषणा केली आहे.गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काल पैठण येथे आयोजित राज्य पोलिस पाटील सघटनेच्या अधिवेशनात बोलताना ,राज्य सरकार प्रत्येक पोलिस पाटलांचा दोन लाख रूपयांचा विमा काढेल अशी घोषणा केली.सेवा बजावताना अपंगत्व,आजार किंवा मृत्यू आल्यास त्यांना मदत करू तसेच वारसांना शासकीय नोकरीत साामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील अशीीही घोषणा त्यांनी केली आहे.गृहमंत्र्यांच्या या घोषणेला विरोध करण्याचे कारण नाही पण मग पत्रकारांच्या याच मागणीकडे सरकार का दुर्लक्ष करीत आहे याचेही उत्तर मिळाले पाहिजे.देशातील किमान सहा राज्यांनी पत्रकार विमा योजना सुरू केलेली आङे.महाराष्ट्र सरकार का टाळाटाळ करीत आहे हे समजत नाही.

अलिबागेत विविध आंदोलनं

0

[divider]आपल्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी अलिबाग मधील सामाजिक संघठनांनी वेगवेगळी आंदोलनं करून अलिबाग दणाणून सोडले.डॉक्‌टर नेरंद्र दाभोळकरांची हत्तया होऊन सहा महिने झाले तरी त्यांच्या मारेकऱ्यांना अध्याप अठक झालेली नाही त्याचा निषेध म्हणून एक उपवास वेदनेचा हे आंदोलन अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीनं करण्यात आलं.

अन्नसुरक्षा यंत्रणेतील चुका दुरूस्त कराव्यात या मागणीसाठी जनजागृती ग्राहक मंच आणि आम आदमी पार्टीच्या वतीने अलिबाग तहसिलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.त्यात अन्यायग्रस्त कुटुबातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.
अलिबाग आणि पेण तालुक्यातील खाडी किनारी असलेल्या मच्छिमारांवर गेली वीस वर्षे होत असलेल्या अन्याय दूर करावा यामागणीसाठी धरमतर मच्छिमार कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
अशा विविध आंदोलनामुळे कालचा दिवस अलिबागकरांसाठी आंदोलनाचा दिवस ठरला.

POPULAR POSTS

error: Content is protected !!