पत्रकार रस्त्यावर

0
1237

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाला चिरडून टाकण्याची तालिबानी भाषा वापरली आहे.त्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने कालच तीव्र शब्दात निषेध केला आहे.त्यांनी आज आपल्या वक्तव्याब्दल सावरासारव केली असली तरी त्याच्या वक्तव्याच्या क्लीप वाहिन्यांवरून दाखविल्या जात असल्याने सुशीलकुमार शिंदे खोटे बोलत आहेत हे समोर येत आहे.त्यांच्या वक्तव्याच्या प्रतिक्रिया आता महाराष्ट्रात सर्वत्र उमटायला सुरूवात झाली आहे.ठिकठिकाणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने निदर्शने केली जात आहेत.सुशीलकुमार यांनी माध्यमांची माफी मागावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.

नगरमध्ये निदर्शने 

 गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी इले. मिडियाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नगरमध्ये निषेध करण्यात आला. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कृती समितीचे जिल्हा निमंत्रख मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील पत्रकार, इले. मडिया तसेच फोटोग्राफर संघटनेचे प्रतिनिधीही यामध्ये सहभागी झाले होते.

 सातारा येथे पत्रकार रस्त्यावर 

केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथे झालेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक मिडियाबाबत केलेल्या वक्तव्यांचा सातारा येथील इलेक्ट्रॉनिक मिडिया असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन ईमासच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांना देण्यात आले. सोलापूर येथील युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यात सुशिलकुमार शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाला ठेचून काढण्याची भाषा केली होती. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. सातारा येथील कॉंग्रेस भवनासमोर इमासच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. इमासने शिंदे यांचा निषेध करुन याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यावेळी ईमासचे अध्यक्ष सुजित आंबेकर, तुषार भद्रे, उपाध्यक्ष ओंकार कदम, शरद काटकर, राहुल पवार, सचिन जाधव, प्रतिक भद्रे, तुषार तपासे, राम पवार, सनी शिंदे, महेश पवार, तुषार जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here