महाडः 19 मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत 

0
1104
महाड दुर्घटनेतील बळींच्या नातेवाईकांना आज प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत  संबंधित तहसिलदारांच्या मार्फत देण्यात आली.महाड दुर्घटनेत एकूण 26 जणांचे बळी गेले आहेत.त्यापैकी 19 जणांची वारस छाननी पूर्ण झाली असून त्यांच्या नातेवाईकांकडे मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आलेे.उर्वरित 7 जणांच्या वारसांबाबतच्या कागदाची छाननी सुरू असून ती पूर्ण करून लवकरच त्यांनाही मदत देण्यात येणार अस्लयाची माहिती महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.या दुर्घटनेत बळी पडलेल्या स्नेहल बैकर,अविनाश बेर्लेकर यांच्या वारसांना रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांनी मदतीचे धनादेश देऊन त्यांचे सांत्वन केले.दरम्यान आज सातव्या दिवशीही शोध मोहिम सुरू होती  मात्र हाती काहीच लागले नाही.शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय शोध गट तयार केले असून स्थानिकांच्या मदतीने नदीकाठी ही शोध मोहिम सुरू असल्याचे सांगितले गेले.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here