तोफांची सुरक्षितता धोक्यात

0
1501

पद्मदुर्ग किल्लयातील साठ किलो वजनाची तोफ चोरीला गेल्याच्या घटनेनंतर रायगड जिल्हयातील 31 जलदुर्ग आणि गड किल्ल्यांवरील तोफा आणि अन्य ऐतिहासिक वस्तुंच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा रायगजडमघ्ये चर्चिला जाऊ लागला आहे.जंजिरा किल्यावर कलाल बांगडी,लांडा कासम,आणि चावरी या मोठ्या तोफा आहेत पण उन पावसाचा मारा सहन करीत बेवारस अवस्थेत पडून आहेत . ..तीच अवस्था अलिबागनजिकच्या कुलाबा किल्ल्यातील.  इथं किल्लयाच्या उत्तरेला चाकं असलेल्या दोन तोफा सुस्थितीत आहेत मात्र किल्ल्यातील इतर तोफा धुळखात पडून आहेत.गंमत अशी की,कुलाबा किल्ल्यात पुरातत्व विभागाचे कार्यालय असून किल्ल्यात जाण्यासाठी शुल्क आकारले जाते मात्र किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा जनत केला जात नसल्याची जनतेची तक्रार आहे.रोह्यातील आगरकोट किल्ल्यावरील तोफांही अशाच बेवारस पडलेल्या आहेत.अलिबागनजिकच्याच सागरगडाकडे पुरातत्व विभागाचे लक्षच नसल्याने इतस्ततः विखुरलेल्या तोफांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.मुरूडनजिकचा कोर्लई किल्ला तर दारूड्ायाचा अड्डा बनलेला असून झाडा-झुडपात पडलेल्या तोफांची चोरी करणं कुणालाही सहज शक्य असल्याची स्थिती तेथे बघायला मिळते.रोह्यानजिक घोसाळगडावर माचीच्या टोकावर एक तोफ अखेरच्या घटका मोजत आहे.खांदेरी-उंदेरी,हिराकोट,कर्नाळा किल्ला या गडावरील तोफांची अवस्था यापेक्षा वेगळी नसल्याचे दिसून या तोफांचे जतन करावे अशी मागणी इतिहास प्रेमीतून होऊ लागली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here