उद्याची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी आणि मतदानाच्या काळात जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा दंडाधिकारी सुमंत भांगे यांनी तब्बल 73 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे.आज हा आदेश काढण्यात आला आहे.
जिल्हयातील 141 गुंडांना तडीपार करण्यात यावे असा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे 25 सप्टेंबर रोजी पाठविला होता.त्यानुसार विविध प्रकारचे गंभीर गुन्हे असलेल्या गुडांवर आज तडीपारीची कारवाई कऱण्यात आली आहे.