उरीमधील हल्ल्यानंतर पाकिस्तान जगात एकाकी पडला.मात्र आज टाइम्स नाऊवर पाकिस्तानच्या चारजणांना बोलावून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली गेली. पॅनलवरील काही भारतीयांनी याला आक्षेप घेतला.नंतर पाकिस्तानी पॅनलिस्टनं असा कोलाहल सुरू केला की,इतरांना बोलता येणार नाही.अखेर चारही पाकिस्तानी पॅनलिस्टला चर्चेतून बाहेर काढलं गेलं.खर तर वाहिन्यांनी कठीण प्रसंगी तरी तारतम्य दाखविलं पाहिजे.देश आज संतप्त असताना पाकिस्तान्यांना पाहुणे म्हणून वाहिन्यावर बोलवायचे आणि कुवत नसलेल्यांना सर सर म्हणत त्याचं ऐकून घ्यायचं याची काही गरज नाही .हे ताबडतोब बंद झालं पाहिजे.टीआरपीच्या नादात वाहिन्या ही थेरं थांबविणार नसतील तर कायद्याचा बडगा उगारून ते थांबविलं पाहिजे.शेवटी वृत्तपत्र स्वातंत्र्य वगैरे पेक्षा देश महत्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. किती पाकिस्तानी वाहिन्यांवर भारतीय तज्ज्ञांना किंवा राजकारण्यांना चेर्चेसाठी बोलावले जाते हे पहावे लागेल.

LEAVE A REPLY