अयोध्येतून रामराज्य रथ यात्रा आजपासून सुरू होत आहे.सहा राज्यातून ही रथ यात्रा जाणार आहे.त्यामध्ये लवकरच निवडणुका होऊ घातलेल्या कर्नाटकचा समावेश आहे.यामध्ये रास्वसंघाशी संबंधित संघटना सहभागी होणार आहेत.रामेश्‍वरम येथे ही यात्रा संपणार आहे.त्यावरचं हे भाष्य..

‘मंदीर वही बनाएंगे’चे नारे
पुन्हा एकदा घुमणार आहेत,
रथयात्रेवर आरूढ  होत
राजकारण होणार आहे..!

तोच रथ,तीच यात्रा
यात  नवं काय आहे ?
आता तर ‘प्रभूं’नाही कळलं आहे,
हा तर फक्त निवडणूक ‘जुमला’ आहे..!

सांगण्यासारखं काही नसलं की,
‘राम नाम’ जपावच लागतं…
नंतर पाच वर्षे मात्र
रामाला वनवासात धाडावंच लागतं..!

भूक,बेकारी,भ्रष्टाचार
सर्वत्र थैमान घालत आहेत …
तुम्हा- आम्हाला राहू ध्या ,
चला ,
रामाला तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत..!

‘बुनियादी’ प्रश्‍नांसाठी
यात्रा कधी निघत नाहीत,
‘यात्रेकरूंना’ ठाऊक आहे..
‘रामाला रथारूढ’ केल्याशिवाय
मतंही  मिळत नाहीत..!

LEAVE A REPLY