राजस्थान सरकारचा निर्णय,
पत्रकारांना घरासाठी 25 लाखांचे बिनव्याजी कर्ज

जयपूर ः निवडणुका आल्यामुळे का असेना राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारनं पत्रकारांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.त्यामध्ये पत्रकारांना स्वतःचं घर घेण्यासाठी आता तब्बल 25 लाख रूपयांचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे.त्यासाठी अट अशी आहे की,कर्ज घेऊ इच्छिणार्‍या पत्रकाराला यापुर्वी सरकारी योजनेतून घर किंवा भूखंड मिळालेला नसला पाहिजे.या शिवाय गंभीर आजाराने ग्रस्त पत्रकार आणि साहित्यिकांना आणि त्यांच्यावर आश्रीत असणार्‍यांना सरकारतर्फे एक लाख रूपये पत्रकार निधीतून उपलब्ध करून दिले जातील.फोटो जर्नालिस्ट आणि छायाचित्रकारांच्या स्वतःचे कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेरे या सारख्या साहित्याचा विमा सरकार उतरविणार आहे.त्याचा प्रेमियम सरकार भरणार आहे.
वसुंधरा राजे यांनी आज 2018-19 साठीचे बजेट आज सादर केले त्यावेळेस या तरतुदी कऱण्यात आलेल्या आहेत..

एस.एम.देशमुख यांनी केलं स्वागत

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी वसुंधरा राजे सरकारनं पत्रकारांबाबत दाखविलेल्या संवेदनशीलतेचं स्वागत केलं असून महाराष्ट्र सरकारनंही आता जास्त विलंब न करता पत्रकार पेन्शन योजना याच अधिवेशनात सुरू करावी अशी मागणी केली आहे..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here