रायगड जिल्हयातील हरिहरेश्वर येेथे आपल्या नातेवाईकांच्या अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा समुद्रात बडून मृत्यू झाला.आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून मृतांपैकी दोघे अंधेरीचे तर एकजण श्रीवर्धनाचा आहे.तिघांचेही मृतदेह हाती लागल्याची माहिती श्रीवर्धन पोलिसानी दिला.हरिहरेश्वरच्या समुद्रात सातत्यानं अपघात होत असल्याने येथे सुरक्षा विषयक उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.