11-12 जुलै 1979 चा  तो दिवस होता. मी तेव्हा माजलगाव कॉलेजमध्ये शिकत होतो .अमेरिकेचनं 1973 मध्ये अवकाशात सोडलेलं स्कायलॅब हे अंतराळ स्थानक कोसळणार या बातमीनं प्रचंड दहशत निर्माण झाली होती.साधारणतः महिनाभर तरी स्कायलॅबची दहशत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसली होती.जिकडं-तिकडं स्कायलॅबचीच चर्चा .जगाचा विनाश होणार,खाऊन-पिऊन मजा करून घ्या असं सांगितलं जात होतं.लेकी-सुना माहेरी येऊन भेटी-गाठी घेऊन जात होत्या..शाळा,कॉलेजात शिकायला असलेली मुलं घरी आई-वडिलां़कंडं पोहोचली होती.असं तेव्हा सांगितलं जायचं की,अनेकांनी आपली संपत्ती विकून ‘जिवाची मुंबई’ करून घेतली होती.कारण ही तसंच होतं.आज दक्षिण पॅसिफिक महासागरात कोसळलेल्या तियांगोंग या अतंराळस्थानकाच्या तुलनेत अमेरिकची स्कायलॅब हे स्टेशन किती तरी मोठे होते.78 टन वजनाचे आणि ऩऊ मजली उंचीचं स्कायलॅब भारतात कोसळणार असं नासानं जाहीर केलं होतं.तसं झालंच असतं तर ही महाकाय वस्तू भारतात कोसळण्यानं होणारं नुकसान प्रचंड मोठंच होतं.सुदैवानं ते भारत आणि ऑस्टे्रेलियाच्या दरम्यान हिंद महासागरात पडले.कोणतंही नुकसान झालं नाही.भारतानं सुटकेचा निःश्‍वास सोडला.पण तेव्हा स्कायलॅबनं जी दहशत निर्माण केली होती ती माझी पिढी अजूनही विसरली नाही . जगबुडीच्या किंवा जगाच्या विनाशाच्या तारखा देऊन आज काही चॅनल्स लोकांमध्ये घबराट निर्माण करतात.तेव्हा आजच्या सारखे आणि आजच्या एवढे चॅनल्स असते तर त्यांनी कसा उच्छांद मांडला असता याची मी कल्पना आपण करू शकतो.

स्कायलॅबनंतर तंत्रज्ञान सुधारले.बरीच प्रगती झाली.पण होणारे अपघात रोखणं अजूनही जमलेलं नाही.2001 मध्ये देखील रशियाचं मीर स्टेशन असंच भरकटलं आणि ते पृथ्वीच्या कक्षेत येऊन समुद्रात पडलं.ते तियांगोंग पेक्षा 16 पटीनं मोठं होतं.25 सप्टेंबर 2011 रोजी देखील अमेरिकेचा युएआरएस हा उपग्रह भरकटला आणि तो पॅसिफिक महासागरात कोसळला.त्याचं वजन सहा टन होतं.

वरील सर्व स्टेशन्स किंवा उपग्रहांच्या तुलनेत चीनची तियांगोंग हे अंतराळस्टेशन फारच छोटं होतं.साधारणतः बसच्या आकाराची ही प्रयोगशाळा आज पहाटे पॅसिफिक महासागरात कोसळळी.34 फूट लांब आणि 11 फूट रूंदीची ही प्रयोगशाळा9 टन वजनाची होती.2011 ला अंतराळात सोडलेली ही प्रयोगशाळा 2016 पर्यंत कार्यरत होती नंतर या प्रयोगशाळेचे काम थांबविले.मात्र काही दिवसांपासून ही प्रयोगशाळा भरकटली आणि आज ती पृथ्वीवर कोसळली.ती मुंबईत कोसळेल अशी बातमी होती.त्यामुळं नाही म्हटलं तरी थोडी भिती वाढली होती.सुदैवानं तसं झालं नाही.

 अंतराळात भरटकणार्‍या या प्रयोगशाळा आणि उपग्रहाचा ‘बंदोबस्त’ करणारी यंत्रणा शास्त्रज्ञाना विकसित करावी  लागणार आहे.मागच्या आठवडयात इस्त्रोनं अवकाशात सोडलेला जी सॅट-6 या उपघ्रहाचा देखील संपर्क तुटला आहे तो अजून प्रस्थापित कऱण्यात येश आलेलं नाही.हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here