कालानुरूप बदल अटळ असतात.या बदलाचं स्वागत करणंही गरजेचं आणि बऱ्याचदा अपरिहार्य असतं.एक काळ असा होता की,प्रिन्ट मिडियाची मक्तेदारी होती.अगोदर दूरदर्शन आणि नंतर खासगी वाहिन्या आल्यानं प्रिन्टला मोठीच स्पर्धा निर्माण झाली.तेव्हा प्रिन्टमध्ये काम कऱणारे सारेच धास्तावले होते.आपलं अस्तित्व टिकणार की नाही या भितीनं.मात्र इलेक्ट्रॉनिकच्या माऱ्यातही प्रिन्टवर फारसा परिणाम झाला नाही.आता सोशल मिडिया आला आहे.प्रत्येक व्यक्ती पत्रकार झाला आहे.अशा स्थितीत आपलं भवितव्य काय? असा प्रश्न प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक माध्यमांना आणि त्यांच्यात काम कऱणाऱ्या पत्रकारांना पडणं स्वाभाविक आहे. त्यामुळं अनेकांनी नव्या माध्यमांशी जुळवून घेत वेब पेपर,ब्लॉग सुरू केले आहेत.व्हॉटसं्‌ ऍपचाही वापर बातम्या देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अर्थात हे बदल होत असले तरी प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक माध्यमांना लगेच आव्हान निर्माण झालं नसलं तरी या दोन्ही परंपरागत माध्यमाचं महत्व नक्कीच कमी झालंय असं मानणारा एक मोठा गट आहे.
याच विषयावर असेल आमचा परिसंवाद
“सोशल मिडियामुळं इलेक्टॉनिक आणि प्रिन्ट मिडियाचं महत्व कमी झालंय काय”?
या परिसंवादात सहभागी होत आहेत खालील मान्यवर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभाग आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे,ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर,महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर.ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे,माहिती आणि जनसंपर्क विभागातील उपसंचालक डॉ.गणेश मुळे,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे,आदि.
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन 6 आणि 7 जून 2015
स्थळः अंकुशराव लांडगे सभागृह,भोसरी
वेळः 7 जून 2015 दुपारी 11.30 ते 1.30
मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची विनंती आहे.

LEAVE A REPLY